सहलीस जाण्यासाठी पैसे दिले नाहीत याचा राग येऊन तालुक्यातील पोखरी येथील सतीश जगन्नाथ घुले वय १९ या तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या के ली. शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

सतीश घुले हा साकू र ता. संगमनेर येथील फिरोदीया  कॉलेजमध्ये बी कॉमच्या पहिल्या वर्षांत शिकत होता. महाविद्यालयाची सहल जाणार असल्याने फी भरण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी त्याने वडलांक डे केली होती. घुले यांच्या कुटुंबाची आर्थिक  स्थिती जेमतेम असल्याने दोन हजार रुपये जमा करणे त्यांच्या पुढे आव्हान होते. तरीही वडलांनी त्यास १ हजार रुपये पाचशे रुपये दिले होते. उर्वरित ५०० रुपये क से उभे करणार याची सतीश यास चिंता होती. दररोज सकोळी कॉजेलला जाणारा सतीश दि. २४ डिसेंबर रोजी कॉलेजला गेला नाही. त्याचे कोरण विचारले असता आजारी असल्याचे त्याने सांगितले होते. सकोळी दहा वाजण्याच्या सुमारास त्याचे आईवडील मोल मजुरीसाठी घराबाहेर पडल्या नंतर कोही वेळाने सतीशही घराबाहेर पडला, तो बराच वेळ घरी परतला नाही. त्यामुळे घरी असलेल्या त्याच्या आजीने सतीश याच्या आईस फोन क रून माहिती दिली असता सतीश याचे आई वडील घरी आले. गावात शोध घेऊनही तो आढळून आला नाही.

रात्र होऊनही तो न परतल्याने नातेवाइकोंक डे चौक शी क रण्यात आली. कोणत्याही नातेवाइकोकडे तो गेला नसल्याचे लक्षात आल्यानंतर रात्रीपासूनच त्याच शोध घेण्यात येत होता.

तीन दिवस शोध घेऊनही तो आढळून न आल्याने सतीशचे आईवडील चिंतेत होते. शनिवारी सकोळी घुले यांचे मेहुणे प्रातर्विधीसाठी गेले असता गावातील प्रभू खैरे यांनी कृषी विभागाच्या योजनेतून खोदलेल्या विहिरीत त्यांनी डोकोवले. त्यांना सतीश याचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला. पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर सहा. पोलिस निरीक्षक  राजेश गवळी यांनी  घटनास्थळी येऊन पोलिसांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर कोढला. टाकळीढोकेश्वर येथील गामीण रुग्णालतयात उत्तरीय तपासणी करण्यात आल्यानंतर तो नातेवाइकोंच्या ताब्यात देण्यात आला.

बोलणे सोडले होते

संगमनेर तालुक्यातील सावरगांव येथील रहिवासी असलेल्या जगन्नाथ घुले यांनी उदरनिर्वाहासाठी पोखरी येथे पाच एक र जमीन घेतली होती. गेल्या सहा वर्षांपासून त्यांचे कु टुंब तेथेच राहत होते. सहलीसाठी पैसे न दिल्याने रागावलेला सतीश दि. २४ रोजी घराबाहेर पडण्यापूर्वी कोही दिवस बेचैन होता. तो घरातील सदस्यांशीही बोलत नव्हता. त्यामुळे सहलीच्या पैशांच्या करण्याव्यतिरिक्त इतर कारणांचाही पोलिस शोध घेत आहेत.