News Flash

लोणेरेजवळील भीषण अपघातात २ ठार

मुंबईहून परतत असतांना त्यांच्या गाडीला हा अपघात झाला.

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. लोणेरेजवळ झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. अपघातग्रस्त हे मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथील रहिवासी आहेत. मुंबईहून परतत असतांना त्यांच्या गाडीला हा अपघात झाला.

लोणेरेजवळील रेपोली येथे सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. म्हाप्रळ येथील मुकादम कुटुंबीय रत्नागिरीच्या दिशेने निघाले होते. त्यांची स्विफ्ट कार ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या दापोली-मुंबई एसटीवर आदळली. याच वेळी मागून येणारा एक ट्रेलर आदळला. यात स्विफ्टमधील आयेशा हुसेन मुकादम वय ५३ आणि हुसेन इब्राहिम मुकादम वय ७० यांचा जागीच मृत्यू झाला, तर खुर्शीद अब्दुल्ला मुकादम वय ८० हे गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेनंतर मुंबई-गोवा महामार्गावर काही काळ वाहतूक खोळंबली होती. मात्र पोलिसांनी स्थानिकांच्या सहकार्याने मदतकार्य पूर्ण करून वाहतूक सुरू केली. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 1:13 am

Web Title: 2 killed in road accident at mumbai goa highway
Next Stories
1 ‘गृहराज्यमंत्र्यांच्या शहरातच अवैध धंदे
2 रत्नागिरी-सिंधुदुर्गची सरासरी दीड हजार मिलिमीटरवर
3 ‘खात्री केल्याशिवाय पोलिस खबऱ्यांना ठार करू नका’
Just Now!
X