News Flash

गडचिरोली : दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश

सी ६० पोलीस जवानांच्या मोहीमेला यश

(संग्रहित छायाचित्र)

धानोरा तालुक्यात आज सकाळी सी ६० पोलीस जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस दलाला यश आले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यात ६० सी जवानांनी सर्चिंग ऑपरेशन अधिक तीव्र केले आहे. यात दोन मृतदेह जवानांना आढळून आल्याची केल्याची माहीती आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये महिलांचा समावेश आहे का याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

घटनास्थळी रक्ताचा सडा मोठा प्रमाणात असल्याने जखमी आणि मृतकांची संख्या जास्त असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.. सर्चिंग आपरेशन नंतरच अधिक माहिती प्राप्त होईल, असं सांगण्यात आलं आहे.

धानोरा तालूक्यातील सावरगांव पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या मोरचुल जंगल परिसरात नक्षलवादी असल्याची असल्याची माहिती प्राप्त झाली होती. याच मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सकाळी सातच्या सुमारास सर्चींग ऑपरेशन सुरू असताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी सी ६० जवानांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्यावेळी सी ६० पोलीस जवानही जशास तसे प्रतिउत्तर दिले. या जवळपास तासभर चाललेल्या धुमचक्रीत सी ६० जवानाचा वाढता दबाव पाहून जंगलाचा फायदा घेत नक्षलवादी पसार झाले. त्यावेळी सी ६० पोलीस जवान सर्चिंग ऑपरेशन तीव्र केले असून नक्षलवाद्यांचे दोन मृतदेह मिळाल्याची प्राथमिक माहिती आहे. सर्चिंग ऑपरेशन पूर्ण झाल्यास अधिक माहिती पोलीस विभागाकडून दिली जणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 1:30 pm

Web Title: 2 naxals killed in dhanora gadchiroli scsg 91
Next Stories
1 “सरकारबद्दल चांगलं लिहावं म्हणून सेना भवनातून सेलिब्रिटींना पैसे जातात”; नितेश राणेंचा खळबळजनक आरोप
2 Maharashtra Lockdown: …अन्यथा महाराष्ट्रात प्रवेश नाही; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
3 महाराष्ट्रात लॉकडाउन १ जूनपर्यंत वाढवला; ठाकरे सरकारकडून निर्बंध जाहीर
Just Now!
X