रायगडकरांसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. दिवसभरात जिल्ह्यात दिवसभरात करोनामुळे २० जणांचा मृत्यू झाला आहे. चोवीस तासांत करोनाचे ३९१ नवे रुग्ण आढळून आलेत. तर ४८० जण उपचारानंतर पूर्ण बरे झालेत. जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १४ हजार ८६३ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात ३९१ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात  पनवेल मनपा हद्दीतील १६४, पनवेल ग्रामिणमधील ४६, उरणमधील २४, खालापूर ३२, कर्जत १५, पेण ३९, अलिबाग १७, मुरुड १, माणगाव १७, रोहा १७, सुधागड २, श्रीवर्धन २, महाड १५  रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीत ६, पनवेल ग्रामिण १, खालापूर ३,  कर्जत १, पेण ४, अलिबाग २, रोहा १, महाड २ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात ४८० जण करोनातून पूर्ण बरे झाले आहेत.

जिल्ह्यातील ४७ हजार ८३७ जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ३६८ रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १ हजार ४००, पनवेल ग्रामिण हद्दीतील ४०७, उरणमधील १७४, खालापूर २५९, कर्जत १०६, पेण २८५, अलिबाग १९६, मुरुड ४३, माणगाव ९३, तळा येथील १, रोहा १४४, सुधागड १८, श्रीवर्धन २९, म्हसळा ७०, महाड १२६, पोलादपूरमधील १७ करोनाबाधितांचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्के ७४ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के टक्के आहे.

महाडमध्ये आत करोनाचे नव्याने ३१ रुग्ण आढळून आले. त्यापैकी २० रुग्ण महाड शहरातील असून ११ रुग्ण महाड तालुक्यातील आहेत. तालुक्यातील करोना रुग्णांची संख्या ३९२ झाली आहे. त्यातील २३७ रुग्णानी करोनावर मात केला आहे. १३४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर २१ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबातील तिघांचा समावेश आहे.

महाड शहरात आढळलेल्या रुग्णांमध्ये प्रभात कॉलनी येथील ३० वर्षांचा पुरुष, फ्लॉव्हर व्हॅली येथील ५१ वर्षांची महिला, साई श्रद्धा इमारतीमधील २५ वर्षांचा पुरुष, केसरी आंगण इमारतीमधील ७ वर्षांची बालिका आणि ३७ वर्षांची माहिला, जवाहर कॉलनी येथील ४७ वर्षांची माहिला, तांबड भुवन येथील ३७ आणि ५४ वर्षांचा पुरुष, काकरतळे येथील ३१ वर्षांचा पुरुष, नवेनगर येथील ५० वर्षांचा पुरुष, ३५ वर्षांचा पुरुष, ५० वयाची महिला, ७६ वयाची महिला, सरेकर आळी येथील ३९ वयाचा पुरुष, ६७ वयाची महिला आणि ३६ वयाचा पुरुष, पोलीस वसाहती मधील ४२ वयाची महिला, १५ आणि १२ वयाची दोन मुले यांचा समावेश आहे.