03 June 2020

News Flash

कुंपण भिंतीवरच २० लाखांचा खर्च!

महानगरपालिकेच्या आगरकर मळय़ातील मीनाताई ठाकरे उद्यानावर लाखो रुपये खर्च होऊनही त्याची पुरती दुर्दशा झाली आहे. त्याची चौकशी करून संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी

| July 14, 2015 03:30 am

महानगरपालिकेच्या आगरकर मळय़ातील मीनाताई ठाकरे उद्यानावर लाखो रुपये खर्च होऊनही त्याची पुरती दुर्दशा झाली आहे. उद्यानावर खर्च झालेले २० लाख रुपये पूर्णपणे वाया गेले असून, त्याची चौकशी करून संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. तसेच हे उद्यान पुरेशा सोयींसह तातडीने खुले करावे, यासाठी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
मनसेचे शहर सचिव नितीन भुतारे यांनी यासंदर्भात मनपाचे प्रभारी आयुक्त विलास बालगुडे यांना निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे, की आगरकर मळय़ातील प्रभाग क्रमांक २७ मध्ये एक एकर जागेत मीनाताई ठाकरे उद्यानाची निर्मिती करण्यात आली. उद्यानाची भिंत आणि प्रवेशद्वारावरच मनपातील शिवसेनेच्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी तब्बल २० लाख रुपये खर्च गेले. मात्र दोन वर्षे होत नाही तोच या उद्यानाची पुरती दुर्दशा झाली असून, उद्यानाची भिंत बऱ्याच प्रमाणात जमीनदोस्त झाली आहे. प्रवेशद्वारही गायब झाले असून बहुधा ते चोरीला गेले असण्याचीच शक्यता अधिक आहे.
दोन वर्षांपूर्वी मनपातील तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी घाईघाईतच या उद्यानाची निर्मिती केली. तत्कालीन महापौर शीला शिंदे यांनी केवळ श्रेयासाठी ही घाई केली. त्याहीवेळी केवळ भिंत बांधून प्रवेशद्वार करण्यात आले. मात्र ज्या गोष्टींची खरी गरज होती, ती खेळणी व उद्यानासाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याच सुविधा येथे शिंदे यांच्या काळातही दिल्या गेल्या नाहीत व नंतरच्या महापौरांनीही त्याकडे लक्ष दिले नाही. मनपा प्रशासनानेही त्याकडे सोयीस्कर पाठ फिरवली.
आता शिंदे यांचे पती अनिल शिंदे हेच या प्रभागाचे नगरसेवक आहेत. तरीही उद्यानाची निर्मिती तर पूर्ण झालीच नाही, मात्र िभतीचाही बराचसा भाग जमीनदोस्त झाल्याने त्यावर झालेला २० लाख रुपयांचा खर्चही वाया गेला आहे. केवळ या भिंतीसाठी म्हणजेच एखाद्या ठेकेदारासाठीच हे २० लाख रुपये खर्च करण्यात आले की काय, अशी शंका घेण्यास येथे पूर्ण वाव आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
उद्यानाची भिंत दोन वर्षांतच जमीनदोस्त झाली, याचाच अर्थ हे बांधकाम अत्यंत निकृष्ट झाले, हे स्पष्ट आहे. त्याची चौकशी करून संबंधितांवर या नुकसानीची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी भुतारे यांनी या निवेदनात केली आहे. तसेच उद्यानातील इतर सोयीसुविधांचे अंदाजपत्रक तयार असून मनपाच्या महासभेत त्याचा ठरावही मंजूर आहे. त्यामुळे तातडीने हे उद्यान परिपूर्ण करून ते नागरिकांसाठी खुले करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2015 3:30 am

Web Title: 20 lakh spent on fence walls
टॅग Mns
Next Stories
1 लोकसेवा हक्क विधेयक विधानसभेत मंजूर
2 ‘ज्यांच्याकडून आपण जीवन घेतो, त्यांच्याच जीवनावर घालाही घालतो’
3 ‘अजित पवारांच्या सूचनेमुळेच १८९ प्रकल्प वादग्रस्त’
Just Now!
X