पालघर : पालघर जिल्ह्यतील ग्रामीण भागात करोना विषाणू संक्रमण झालेले दहा नवीन रुग्ण वाढले आहेत. त्यात पालघर तालुक्यात आठ नागरिकांना तर डहाणू तालुक्यात वैद्यकीय सेवेत असलेल्या करोना संसर्ग झाल्याचे उघडकीस आले असून त्या अनुषंगाने २०० हून अधिक अधिक नागरिकांचे थुंकीचे (स्व्ॉब) नमुने तपासणी साठी पाठविण्यात येत आहेत.

तर वसई विरार मध्ये १० नव्या रुग्णांची नोंद झाल्याने शहारतील एकूण करोनाबाधीत रुग्णांची संख्या आता ६३ एवढी झाली आहे. शुक्रवारी वसईत नव्याने लागण झालेल्या रुग्णांध्ये ४ रुग्ण नालासोपारा मधील असून वसईत २ आणि विरार मधील ३ रुग्णांचा समावेश आहे.

वसई-विरार पालिकेने शहरातील ९८० जणांचे चाचणी अहवाल तपासणीसाठी पाठवले असून त्यातील ६९२ हे करोनाग्रस्तांच्या संपर्कातील आणि २९ परदेशी प्रवास केलेले आहेत.

पालघर तालुक्यातील काटाळे या गावी वीटभट्टीवर काम करणारम्य़ा आदिवासी समाजातील एका कुटुंबातील तीन वर्षीय मुलीला करोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले होते. मात्र, त्या मुलीचा दुसरा तपासणी अहवाल नकारात्मक आल्याने काहीसा सुटकेचा श्वस आरोग्य यंत्रणेने व येथील नागरिकांनी घेतला होता. या रुग्णाचा अनुषंगाने काटाळे येथील वीटभट्टी संदर्भातील पाच नवीन रुग्ण आढळले आहेत.