शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत जिल्ह्यातील २० विद्यार्थी झळकले असून त्यामध्ये चौथीचेच ७ आणि सातवीच्या १३ जणांचा समावेश आहे. सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विभागातून श्रेयश बाळासाहेब यादव व चौथीमध्ये तेजस्विनी भिलवडे यांनी गुणवत्ता यादीत चौथे स्थान तर जिल्ह्यात पहिले स्थान पटकावले आहे. जिल्ह्यातील ८७२ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.
चौथीच्या शिष्यवृत्तीसाठी ३१ हजार ८६२ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापकी ३० हजार ४३० मुलांनी परीक्षा दिली. त्यापकी १६ हजार ६२७ विद्यार्थी पास झाले असून ५३ टक्के निकाल लागला आहे. ५ हजार ४८५ विद्यार्थ्यांना ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. ४३६ जणांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.
सातवीच्या शिष्यवृत्तीसाठी २४ हजार ५३५ जणांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल ४२.३२ टक्के लागला असून १४ हजार ८३० विद्यार्थी पास झाले आहेत. यापकी ४३६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.