पालघर जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये बहुरंगी लढतीमुळे चुरस

नीरज राऊत, पालघर

पालघर जिल्हा परिषदेच्या ५७ जागांपैकी मोखाडा तालुक्यातील आसे आणि पोशेरा तसेच वसई तालुक्यातील कळंब या तीन ठिकाणी जागांकरिता बिनविरोध निवड झाली असून उर्वरित ५४ जागांसाठी दोनशेहून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे सरावली (पालघर) आणि कळंब (वसई) या दोन गणांमध्ये देखील बिनविरोध निवड झाली.

जिल्हा परिषदेच्या ५७ जागांकरिता उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरिता काल ३० डिसेंबर हा अखेरचा दिवस होता. दरम्यान डहाणू तालुक्यातील कासा व वनई या गटातील उमेदवारांनी न्यायालयात दाद मागितल्याने या दोन गटातील उमेदवारी अर्ज मागे घेण्यास आज सायंकाळपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. दरम्यान उर्वरित ५२ जागांसाठी २०२ उमेदवार रिंगणात आहेत.

या निवडणुकीत सात गटामध्ये आमनेसामने थेट लढती होणार असून १६ गटांमध्ये तिरंगी लढती होणार आहे. त्याचप्रमाणे १९ जिल्हा परिषद गटांमध्ये चार उमेदवार रिंगणात असून दोन ठिकाणी प्रत्येकी पाच उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्याचप्रमाणे पाच गटांमध्ये प्रत्येकी सहा उमेदवार रिंगणात असून प्रत्येकी एक गटामध्ये अनुक्रमे सात, आठ व नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे दिसून आले आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने ४७ उमेदवार निवडणूक लढवीत असून भाजपतच्या वतीने ४२, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे २१, बहुजन विकास आघाडीचे १९, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे १५, काँग्रेस पक्षाचे दहा, मनसेचे आठ तसेच इतर ४० उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.

या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने आघाडी करण्याचा जिल्हा पातळीवरचा प्रयत्न केला होता.

लढती अशा 

बिनविरोध

कळब (५७), आसे (२८), पोशेरा (२९)

थेट लढत

बोईसर (वंजारवाडा) (४१), सरावली (४२), सावरे—ऐंबूर (४७), शिगाव (५०), आलोंडे (२३), उधवा (५), बोर्डी (६)

तिरंगी लढत

दांडी  (३८), पास्थळ (३९), खैरापाडा (४३), नंडोरे—देवखोप (४८), सातपाटी (४९), केळवा (५१), एडवण (५२), सफाळे (५३), चंद्रपाडा (५५), अर्नाळा (५६), कैनाड (१४), धाकटी डहाणू (१६), चिंचणी (१७), वावर (२४), कौलाळे (२७), मोज (३२)

चौरंगी लढती 

तारापूर (३७), शिगांव—खुताड (४४), मनोर (४६), सूत्रकार (२), डोंगरी (३), झाई (४), भाताणे (५४), धामणगाव (७), मोडगाव (८), सायवन (९), सरावली डहाणू (१५), न्याहाळे बु. (२५), कासरवाडी (२६), खोडाळा (३०), गारगाव (३१), मांडा (३३), पलसाई (३४) अविटघर (३५), कुडूस (३६)

पाच उमेदवार

उपलाट (१), गंजाड (११)

सहा उमेदवार

बोईसर (काटकरपाडा) (४०), बर्?हाणपूर (४५), तलवाडा (१९), ओसरविरा (१०), कुमशेत (१३)

सात उमेदवार

उटावली (२०)

आठ उमेदवार

दादडे (२०)

नऊ  उमेदवार

कुर्झे (९)

तालुका            जागा        उमदेवार

पालघर             १७          ५६

डहाणू                 १३      ४४

वाडा                   ६         २३

तलासरी             ५         १९

विRमगड          ५           ३२

जव्हार             ४             १४

वसई                 ४          १०

मोखाडा            ३            ४

एकूण            ५७          २०२