२०१८ च्या अखेरचा प्रवास सुरू झाला आहे. २०१९ सुरू होण्यास फक्त १५ दिवस बाकी आहेत. अनेक जणांना २०१९चे वेधही लागले असतील. नववर्षात फिरायला जाण्याचं किंवा लग्नाकार्याचं प्लानिंग करायचं असेल, तर सुट्ट्या पाहणं मस्टच! यंदाच्या वर्षात रविवारी आलेल्या सार्वजनिक सुट्यांमुळे रजेच्या नियोजनाला कात्री लागली असली, तरी २०१९ मध्ये त्याची कसर भरून निघणार आहे. २०१९ मध्ये सण, समारंभ आणि सहलीच्या नियोजनासाठी नोकरदारांना सुट्ट्यांची खूशखबर आहे. दुसरा आणि चौथा शनिवारसह रविवारधरून एकूण ९० पेक्षा आधीक सुट्ट्यांची पर्वणी मिळणार आहे. शनिवार आणि रविवारी सार्वजनिक सुट्ट्या रविवार आणि शनिवारी आल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना यावर्षीप्रमाणेच फटका बसला आहे. रविवार आणि दुसरा, चौथा शनिवारी आठ सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या आठ सुट्ट्या वाया गेल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारला जोडून सोमवारी चार सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे ज्यांना सर्व शनिवार-रविवार, किंवा किमान एक आड एक शनिवार सुट्टी असते, त्यांना शनिवार ते सोमवार असा लाँग वीकेंड प्लान करण्याची संधी चारवेळा मिळणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2019 holidays list
First published on: 15-12-2018 at 08:58 IST