29 September 2020

News Flash

उस्मानाबादमध्ये करोनाचे २०९ रुग्ण, आत्तापर्यंत ६१ रुग्णांचा मृत्यू

करोनाच्या ११८७ रुग्णांवर उपचार सुरु

प्रतिकात्मक छायाचित्र

उस्मानाबाद  जिल्ह्यात करोना विषाणू संसर्गाचा कहर वाढत असून गुरूवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार स्वॅब चाचणीत ११४ तर रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचणीत ९५ असे एकुण २०९ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. बुधवारपर्यंत एकूण बांधितांची संख्या १६९१ एवढी होती. त्यात आणखी २०९ ने वाढ झाली असून जिल्ह्यातील एकूण बांधितांची संख्या आता १९०० वर पोहचली आहे. सुरूवातीच्या काळात तपासलेले स्वॅब आणि त्यातील पॉझिटिव्ह अहवाल प्रमाण लक्षात घेता सद्यस्थितीत आढळून येत असलेल्या पॉझिटिव्ह अहवालांचा वेग अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे.

उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयामार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे २०३ आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथील कोविड चाचणी केंद्राकडे पाठविण्यात आलेल्या १५३ अशा एकुण ३५६ नमुन्यांचे अहवाल गुरूवारी रात्री प्राप्त झाले. तर १०३२ जणांची रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचणी घेण्यात आली. यातील तब्बल ९५ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

स्वॅब चाचणी अहवालामध्ये उस्मानाबाद शहर व तालुक्यात १५, उमरगा २४, तुळजापूर २२, कळंब २७, परंडा ७, भूम १८ तर लोहारा तालुक्यात १ रुग्ण असे एकूण ११४ रुग्ण आढळून आले आहेत. तर रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचणीत उस्मानाबाद शहर व तालुक्यात ५९, उमरगा १२, तुळजापूर ३, कळंब ३, परंडा १०, भूम ६ तर लोहारा तालुक्यात २ रुग्ण आढळून आले आहेत.

उस्मानाबाद शहरात जिल्हा रुग्णालय, स्पर्श रुग्णालय, संत गोरोबाकाका नगर, संत ज्ञानेश्वर नगर येथे तर तालुक्यातील बेंबळी, तेर, उपळा, येडशी येथे नव्याने रुग्ण आढळले आहेत. तुळजापूर येथे उपजिल्हा रुग्णालण, पोलीस ठाणे, वेताळ गल्ली, एस.टी. कॉलनी, धारीवाल टाऊन, टाटा सामाजिक विज्ञान संस्था येथे तर तालुक्यातील काक्रंबा, नळदुर्ग, तुळजापूर खुर्द येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत. उमरगा शहरातही एस.टी. कॉलनी, रामनगर, भीमनगर, दत्त कॉलनी, गौतम नगर, तसेच तालुक्यातील कोरेगाव, माडज, मुरूम येथे बाधित रुग्ण आढळले. कळंब शहरासह तालुक्यातील रत्नापूर, येरमाळा, डिकसळ, मस्सा येथे तर भूम, परंडा, लोहारा तालुक्यातही नवे रुग्ण आढळून आलेले आहेत.

६ ऑगस्ट रोजीपर्यंत जिल्ह्यात एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता १९०० वर पोहचली असून ६५२ जणांना उपचाराने बरे झाल्यानंतर घरी पाठविण्यात आले आहे. तर ११८७ जणांवर उचार सुरू असून ६१ जणांचा आजवर मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 9:31 pm

Web Title: 209 new corona cases in osmanabad and 61 patients dead in last 24 hours scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 वर्धा : नागपूर-तुळजापूर महामार्गावरील पूल दुरूस्तीनंतर वाहतुकीसाठी खुला
2 महाराष्ट्रात ११ हजार ५१४ नवे करोना रुग्ण, ३१६ मृत्यू
3 सलाम! मातृनिधनाचं दुःख बाजूला सारून आरोग्यमंत्री राजेश टोपे कर्तव्यावर रुजू
Just Now!
X