जिल्ह्यात आज, शुक्रवारी ५३२ रुग्ण करोनामुक्त झाले, तर ४५९ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात करोनामुळे २१ जणांचा मृत्यू झाला. आजवरची एका दिवसातील बळींची ही सर्वाधिक संख्या आहे.

जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ८९९३ इतकी झाली आहे.  दरम्यान, आज, शुक्रवारी सायंकाळी सहापर्यंत रुग्ण संख्येत ४५९ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३११४ इतकी झाली आहे. काल सायंकाळी मृतांची संख्या १३२ होती, ती आज सायंकाळी वाढून १५३ झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ८२, अँटीजेन चाचणीत १७७ आणि खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २०० असे एकूण ४५९ रुग्ण गेल्या चोवीस तासात बाधित आढळले.

बाधित आढळलेल्यांची संख्या पुढीलप्रमाणे—नगर शहर १८१, नगर तालुका ३२, भिंगार १८, पारनेर १९, शेवगाव २७, कोपरगाव ९, कर्जत २७, जामखेड १३, राहुरी ९, अकोले १०, श्रीगोंदे १९, नेवासे ३३, श्रीरामपूर १४, पाथर्डी १४, राहता १०, संगमनेर २१ व लष्करी रुग्णालय ३.

दरम्यान, आज एकूण ५३२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये नगर शहरातील २०३, संगमनेर ४३, राहाता १०, पाथर्डी ३२, नगरतालुका २३, श्रीरामपूर १९, भिंगार २४, नेवासा २१, श्रीगोंदा २४, पारनेर २०, अकोले ७, राहुरी ८, शेवगाव २५, कोपरगाव ३४, जामखेड १०, कर्जत २९, लष्कर रुग्णालय २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्याची आकडेवारी

बरे झालेले रुग्ण : ८९९३

उपचार सुरू असलेले रुग्ण : ३११४

मृत्यू : १५३

एकूण रुग्ण : १२२६०