मागील दोन महिन्यात गारपिटीने त्रस्त २२ शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करत जीवनयात्रा संपविली. यातील केवळ ६ शेतकऱ्यांच्या मदतीच्या प्रस्तावास पात्र ठरविण्यात आले. उर्वरित १३जण शासकीय मदतीस अपात्र ठरल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे.
राज्यात मागील दोन महिन्यांत गारपिटीने मोठे नुकसान केले. जिल्ह्यास याचा मोठा फटका बसला. गारपिटीमुळे आíथक अडचणीत सापडलेल्या २२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यातील केवळ सहा जणांना सरकारकडून मदत मिळणार आहे. अन्य १३ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून अपात्र ठरविण्यात आले. आत्महत्याग्रस्त शेतकरी थकीत कर्जदार असणे गरजेचे असल्याचे शासकीय अध्यादेशात म्हटले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी नियमित कर्जदार असल्यास त्याला सरकारकडून मदत देता येत नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांबरोबरच वीज पडून जिल्ह्यात ११जणांचा मृत्यू झाला. या सर्वाना जिल्हा प्रशासनाने मदत दिली. वीज पडून ठार झालेल्या ११जणांना १६ लाख ५० हजार रुपये मदत करण्यात आली, तर अवकाळी पावसामुळे जखमी झालेल्या ७ शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाले. पकी तीन जणांना आíथक मदत देण्यात आली. उर्वरित चार जणांना लवकरच ती मिळेल, असेही डॉ. नारनवरे यांनी सांगितले. मृत जनावरांच्या मदतीपोटी ३ लाख ३ हजार रुपयांची मदत दिली असल्याचे त्यांनी सांगितले.