जत तालुक्यातील शेतक ऱ्याचा यशस्वी प्रयोग

सांगली : हापूसच्या चवीबरोबरच केसरचा गोडवा, पायरीचा रसाळपणा, मोहक रंगसंगतीने आर्किषत करणारा लालबाग, तोतापुरीसह देश-विदेशातील तब्बल २२ प्रकारचे आंबे एकाच झाडाला लगडल्याचे चित्र यंदा जत तालुक्यातील अंतराळ गावच्या काकासाहेब सावंत यांच्या शेतात पाहण्यास मिळाले. मूळचा नर्सरीचा व्यवसाय असलेल्या पुण्यातील नोकरी सोडून दुष्काळी भागात शेतीच्या प्रेमापोटी आलेल्या या तरुणाने हा नवा प्रयोग केला आहे.

सावंत यांनी एकाच आंब्याच्या झाडावर देश-विदेशातील आंब्याच्या तब्बल ४४ वाणांचे कलम केले आहे. यापैकी २२ वाणांचे आंबे यंदाच्या हंगामात चाखण्यास मिळाले. यामध्ये केसर, हापूस, सिंधू , रत्ना, सोनपरी, नीलम, निरंजन, आम्रपाली, क्रोटोन, तैवान, लालबाग, दशेरी, राजापुरी, बेनिश, पायरी, बारोमाशी, वनराज, मलगोबा, मल्लिक्का, तोतापुरी अशा देशी आणि काही  विदेशी आंब्याच्या जाती समाविष्ट आहेत.

three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
orange cargo truck overturned at Buldhana
ट्रक उलटला; मात्र लोकांची झाली चंगळ! ग्रामस्थांनी पोते भरून…

एकाच झाडावर सावंत यांनी वेगवेगळ्या जातीची ४४ कलमे केली. यातील २२ जातीचे कलम लागू झाले. यंदा या एकाच झाडांच्या आंब्याला २२ प्रकारचे आंबे लगडले आहेत. यातील काही आंब्याचा तोडा झाला आहे. २२ जातीचे मिळून जवळपास ७०० आंबे लागले होते. काही जातीचे ४ ते ५४ डझन तर काही जातीचे २-३ डझन आंबे लागलेत. पहिल्याच वर्षी या एकाच झाडावर २२ प्रकारच्या आंब्याचे जातीचे उत्पादन घेऊन सावंत यांनी आंबा शेतीत एक नवीन प्रयोग यशस्वी केला असून तो पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी त्यांच्या बागेला भेट देऊ लागले आहेत.

रोपवाटिकेचा व्यवसायही असल्याने आंब्याच्याही प्रत्येक जातीची रोपे विक्रीस आहेत. ही कलमे खरेदीस आलेले ग्राहक प्रत्येक जातीचे फळ कसे आहे, हा त्यांचा नेहमीचा प्रश्न असायचा. मग आता प्रत्येक झाड जर स्वतंत्र लावायचे ठरले तर जागा आणि गुंतवणूक वाढणार होती. म्हणून मग एकाच झाडावर सर्व जातीच्या झाडांची कलमे तयार करता येतील का, या कुतूहलातून हा प्रयोग केला आणि त्यात यशस्वी झालो. – काकासाहेब सावंत