कीटक प्रजातीत मोडणाऱ्या फुलपाखरांची संख्या जगभरातील १ लाख ५० हजार कीटकांपैकी १७ हजार ८२० एवढी असून, अलीकडेच फुलपाखरांचे अभ्यासक कृष्णमेघ कुंटे यांनी अरुणाचल प्रदेशात ‘बँडेड टीट’ या नवीन फुलपाखराचा शोध लावला आहे. सातपुडय़ाच्या पर्वतरांगेतही विविध प्रजातींच्या फुलपाखरांचे अस्तित्व असून, राज्य सरकारने राज्य फुलपाखराचा दर्जा दिलेले ब्ल्यू मॉरमॉनचे (राणी फुलपाखरू) सातपुडा पर्वतरांगात वास्तव्य आढळून आले आहे.
अलीकडच्या आकडेवारीनुसार भारतात १ हजार ५०२ प्रजातींची फुलपाखरे असून महाराष्ट्रात २२७ च्या घरात फुलपाखरांच्या प्रजाती आहेत. फुलपाखरांच्या पॅपीलोनीडी, निम्फॅलीडी, लायसिनीडी, परायडी आणि हेस्पिरिडी, अशी पाच कुळे आहेत. सातपुडय़ातील मेळघाटाच्या जंगलात एकूण १२७ प्रकारची फुलपाखरे आढळतात. मेळघाट परिसरात निरीक्षण केल्यास एकाच भेटीत किमान २० ते २५ फुलपाखरांच्या प्रजाती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. मेळघाट, पेंच आणि संपूर्ण सातपुडा आणि त्यालगतचा परिसर फुलपाखरांच्या बाबतीत समृद्ध आहे. अनेक दुर्मिळ फुलपाखरांच्या प्रजाती या ठिकाणी दिसून येतात. सातपुडा जंगल परिसरातील फुलझाडे व इतर वनस्पतीजीवन समृद्ध असल्याने येथे फुलपाखरांची वैविध्यता मोठय़ा प्रमाणावर आहे. फुलपाखरांचा मोठा आधार वनस्पती असल्याने फुलातील मधुरस घेऊन ते गुजराण करतात. सातपुडा पर्वतरांगात प्रामुख्याने बहुरूपी, स्वैरिणी, शेंदूर टोक्या, केशर टोक्या, भटक्या, परदेशी, नवाब, मयूर भिरभिरी, उर्वशी, नायक, चिमी, चांदवा, चित्ता, अशी तब्बल १६७ प्रजातींची फुलपाखरे विदर्भ आणि सातपुडय़ाच्या जंगलात आढळून येतात. निसर्गसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या फुलपाखरांच्या अधिवासाचा ऱ्हास, कीटकनाशके व तणनाशकांचा वाढता वापर, जंगल भागात वाढती गुरेचराई, जंगल भागात शेतीचे वाढत जाणारे अतिक्रमण व वनवणव्यामुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
99 fights among psychiatric patients in three years in Nagpur
नागपूर: मनोरुग्णांमध्ये तीन वर्षांत ९९ वेळा हाणामारी
What was the cause of the Rwandan genocide 30 years ago
१०० दिवसांत ८ लाखांची कत्तल…३० वर्षांपूर्वीच्या रवांडा नरसंहाराचे कारण काय होते? सद्यःस्थिती काय?
Botswana threatening Germany to send elephants
२० हजार हत्तींचं जर्मन कनेक्शन काय? जाणून घ्या