महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या १३६४ वर पोहचली आहे. तर आत्तापर्यंत करोनाची लागण झाल्याने ९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. आज महाराष्ट्रात २२९ करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यामुळे ही संख्या वाढली आहे. करोनामुळे आज दिवसभरात २५ जणांचा मृत्यू झाला. आता राज्यात करोनाग्रस्तांची संख्या १३६४ झाली आहे. आज जे २५ मृत्यू झाले त्यामध्ये १५ पुरुष तर १० महिला आहेत. २५ मृत रुग्णांपैकी १२ जण ६० वर्षांवरील वयाचे आहेत. मृतांपैकी ११ जण ४० ते ६० या वयोगटातले आहेत. तर मृतांमधले दोघेजण हे ४० वर्षांच्या खालील होते. २५ मृतांपैकी २१ जणांना मधुमेह, अस्थमा, हृदयविकार यांसारखे आजार होते असंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

महाराष्ट्रात कुठे किती रुग्ण?
मुंबई – ८७६
मृत्यू -५४

पुणे- १८१
मृत्यू २४

पिंपरी चिंचवड-रुग्ण-१९

पुणे ग्रामीण-६

ठाणे-२६ रुग्ण
मृत्यू ३
कल्याण डोंबिवली-३२
मृत्यू-२
नवी मुंबई-३१
मृत्यू-२
मिरा भाईंदर-४
मृत्यू-१
वसई विरार-११
मृत्यू-२
पनवेल-६
ठाणे ग्रामीण, पालघर ग्रामीण- प्रत्येकी ३
मृत्यू १

सातारा-६
मृत्यू-१
सांगली-२६
नागपूर-१९
मृ्त्यू-१
अहमदनगर-१६
बुलढाणा-११
मृत्यू १
अहमदनगर ग्रामीण-९
औरंगाबाद-१६
मृत्यू-१
लातूर-८
अकोला-९
मालेगाव-५
मृत्यू-१
रत्नागिरी, यवतमाळ, उस्मानाबाद<br />अमरावती-४
मृत्यू-२

कोल्हापूर-५

उल्हासनगर, नाशिक, नाशिक ग्रामीण जळगाव, जळगाव ग्रामीण, औरंगाबाद ग्रामीण, जालना, हिंगोली, वाशिम, गोंदिया, बीड, सिंधुदुर्ग
या ठिकाणी प्रत्येकी १ रुग्ण
मृत्यू २ (जळगाव)
इतर राज्यातील-८
एकूण १३६४
मृत्यू ९७

महाराष्ट्राची चिंता वाढवणारीच ही बातमी ठरली आहे. आत्तापर्यंत ३० हजार ७६६ जणांची करोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी आजपर्यंत १३६४ पॉझिटिव्ह ठरले आहेत. १२५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ३५ हजार ५३३ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. तर ४ हजार ७३१ जणांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आलं आहे. अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.