दिवसभरात ११३ जणांची करोनावर मात

रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल २३४ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ३ हजार ६८३ वर पोहोचली आहे. दिवसभरात ११३ जणांनी करोनावर मात केली आहे. तर बुधवारी उपचारा दरम्यान पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात २३४ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात  पनवेल मनपा हद्दीतील १३१, पनवेल ग्रामिण मधील ५०, उरणमधील ५, खालापूर ७, कर्जत ५, पेण ९, अलिबाग ४, मुरूड २, माणगाव ११, तळा १, रोहा ४, श्रीवर्धन २ महाड १, पोलादपूरच्या  रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीतील ४ तर उरणमधील एका रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात ११३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील ८७१६ जणांची करोना चाचणी करण्यात आली. यातील ५००५ जणांचे अहवाल नकारात्मक आले. ३६८३ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर २८ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. २१९५ जणांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार ३५५ करोनाबाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील ६९०, पनवेल ग्रामिण हद्दीतील २९१, उरणमधील ५३,  खालापूर ४२, कर्जत ६८, पेण ५०, अलिबाग ५०,  मुरुड ८, माणगाव २८, तळा येथील २, रोहा ४८, सुधागड १, श्रीवर्धन ११, म्हसळा ०, महाड ८, पोलादपूरमधील ५ करोनाबाधितांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १३३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांच्या संपर्कात आलेले ७९ हजार १४५ जणांना सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. करोना रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे.

रायगड जिल्ह्यात ५० जणांच्या उपस्थितीत लग्न समारंभ आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मात्र त्यासाठी संबंधित तहसिलदार कार्यालय अथवा महानगरपालिका प्रशासनाकडून पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे, मंगल कार्यालये, खुली मैदाने, लॉन्स, अथवा घराच्या परिसरात हे लग्न समारंभ आयोजित करता येतील, मात्र यावेळी आंतरभान नियम आणि मुखपट्टय़ांचा वापर करणे आवश्यक असणार आहे. असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जारी माहिती पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे.