News Flash

महाराष्ट्रात २३ हजार ४४६ नवे करोना रुग्ण, ४४८ मृत्यू

मागील २४ तासांमध्ये १४ हजारांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये २३ हजार ४४६ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ४४८ मृत्यूंची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची बाधा होऊन २८ हजार २८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची एकूण संख्या ९ लाख ९० हजार ७९५ इतकी झाली आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात २ लाख ६१ हजार ४३२ अॅक्टिव्ह केसेस आहेत. मागील २४ तासांमध्ये १४ हजार २५३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकूण ७ लाख ७१५ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ७०.७२ टक्के इतके झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४९ लाख ७४ हजार ५५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ९ लाख ९० हजार ७९५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६ लाख ३० हजार ७०१ व्यक्ती होम क्वारंटाइन आहे तर ३८ हजार २२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

राज्यात सध्या २ लाख ६१ हजार ४३२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात २३ हजार ४४६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ९ लाख ९० हजार ७९५ झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2020 9:43 pm

Web Title: 23446 new covid19 cases and 448 deaths reported in maharashtra today 14253 patients discharged scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “भीती गुलामांना असते,” फडणवीसांवरील टीकेचं खडसेंकडून समर्थन
2 देवेंद्रजींकडून त्रास झाला म्हणून बोललो; एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर पुन्हा निशाणा
3 बेरोजगारी, अर्थव्यवस्था, आरोग्य व्यवस्था या गोष्टी कंगनापेक्षा अधिक महत्त्वाच्या : अमोल कोल्हे
Just Now!
X