महाराष्ट्रात २४ हजार ६१९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ३९८ मृत्यू झाले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये १९ हजार ५२२ रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत ८ लाख १२ हजार ३५४ रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ७०.९० टक्के झाला आहे. तर महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची आत्तापर्यंतची संख्या ११ लाख ४५ हजार ८४० इतकी झाली आहे.

महाराष्ट्रात आजवर तपासण्यात आलेल्या ५६ लाख ४ हजार ८९० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११ लाख ४५ हजार ८४० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७ लाख ७० हजार ७४८ होम क्वारंटाइन आहेत. तर ३६ हजार ८२७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज ३ लाख १ हजार ७५२ केसेस अॅक्टिव्ह आहेत.

राज्यातील प्रमुख शहरांमधली अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या
मुंबई-३२ हजार ९५९
ठाणे-२९ हजार ३२३
पुणे-८१ हजार ५४०
सातारा-९ हजार १५१
कोल्हापूर-९ हजार ६८०
नाशिक-१२ हजार ८६९
औरंगाबाद-७ हजार ८८८
नागपूर – २१ हजार २७३

आज राज्यात २४ हजार ६१९ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. आता राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या ११ लाख ४५ हजार ८४० झाली आहे. आज राज्यात ३९८ मृत्यूंची नोंद झाली आहे. तर पूर्वीचे ७० मृत्यू असे ४६८ मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या ४६८ मृत्यूंपैकी २८६ मृत्यू हे मागील ४८ तासांमधील आहेत. तर ७७ मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित १०५ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावाधीपूर्वीचे आहेत. पोर्टलनुसार संख्या अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सगळ्या मृत्यूंची नोंद आज झाली आहे.