इचलकरंजी येथील शिवम सहकारी बँकेत कै. वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती जमाती सूत गिरणी लि. सोलापूर या संस्थेच्या बनावट कागदपत्राद्वारे कर्जखाते उघडून २४ कोटी ४० लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेच्या विद्यमान अध्यक्षांसह संचालक व अधिकारी अशा ३७ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार लेखापरीक्षक लक्ष्मण शंकर हारगापुरे (पुणे) यांनी दिली आहे.

इचलकरंजी येथील कोल्हापूर रोडवरील शिवम सहकारी बँकेत सन २०११ ते मार्च २०१८ या कालावधीत कै. वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती जमाती सूत गिरणी लि. सोलापूर या नावाने बनावट कागदपत्रे, शिक्का, लेटरहेड तयार करुन खोट्या सह्या करुन सदर संस्थेत पाच बनावट कर्ज खाती उघडण्यात आली. त्याद्वारे खोट्या जमा-खर्चाच्या नोंदी करुन व खोटी हिशोबपत्रके तयार करुन २४ कोटी ४० लाख ४० हजार ७९९ रुपयांचा अपहार करुन बँकेचे सभासद, ठेवीदार यांचा विश्‍वासघात केल्याचे संस्थेच्या अंतर्गत लेखापरीक्षणात आढळून आले. अपहार प्रकरणी तक्रार दिल्यानंतर शिवजीनगर पोलिसात उपरोक्त सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

women office bearers of Thackeray group in Kalyan join Shindes Shiv Sena
कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का, महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
Displeasure of office bearers in BJPs election planning meeting
अलिबाग : भाजपच्या निवडणूक नियोजन बैठकीतही पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर…
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ

गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये बँकेचे विद्यमान अध्यक्ष अभिजित महादेवराव घोरपडे (रा. कोल्हापूर), मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत बाबासाहेब चव्हाण (रा. मिरज) यांचेसह विद्यमान संचालक सुरेंद्र मधुकर चौगुले (रा. अंकलखोप जि. सांगली), उदयसिंह प्रतापराव शिंदे (रा. आर्दाळ ता. आजरा), सुरेंद्र सुर्यकांत काळे (रा. कडेपूर जि. सांगली), शिवाजी यदा शेळके (रा. कोरोची), जयदीप हणमंतराव घोरपडे (रा. कोल्हापूर), रामचंद्र भाऊ वांगणेकरा (रा. आर्दाळ), सुनिल पोपट रेणुसे (रा. रेणुकशेवाडी जि. सांगली), पतंगराव शिवाजी यादव (रा. कडेपूर), जितेंद्र वसंतराव करांडे (रा. शाळगांव जि. सांगली), राजाराम आकाराम तवर (रा. कडेगांव), शिवाजी मारुती लोहार (रा. इचलकरंजी), विद्या मोहन यादव (रा. इचलकरंजी), सविता अविनाश यादव (रा. इचलकरंजी), सुखदेव उत्तम पोवार (रा. बोंबाळेवाडी जि. सांगली), सुहास पांडुरंग बुगड, विजयकुमार भानुदास पांढरपट्टे, विश्‍वजीत वसंतराव देसाई, बँकेचे संस्थापक , माजी अध्यक्ष के. बी. तथा कृष्णराव बळवंत कवठेकर, नंदकुमार वसंतराव देसाई, रायगोपाल भंवरलाल लोया, संदेश यशवंत दळवी, नितीन गोपीनाथ खेडकर, अनिल विठ्ठलराव कुर्‍हाडे, लक्ष्मण धोंडीबा कांबळे, संजय आप्पासो जुवे, सीमा शांताराम मांगले, विजयमाला शांताराम पाटील, कुबेर आण्णासो पाटील (सर्व संचालक), बँकेच्या व्यवस्थापिका नसिमा कादर तहसिलदार, रोखपाल शिवानंद शंकर नकाते, अधिकारी वसंत अच्युतराव हुक्केरी, अशोक चंद्रकांत सावरतकर, कारकून रावसाहेब बाळासाहेब ऐतवडे, रत्नाप्पा वसंत आदुके तर कर सल्लागार मनोज जोशी यांचा समावेश आहे.