News Flash

इसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून परभणीतून एकाला अटक

परभणीतून शाहीद खानला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली.

प्रतिकात्मक छायाचित्र

इसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून शनिवारी रिझवान खानला कल्याणमधून अटक केल्यानंतर आज परभणीतून आणखी एकाला याच संशयावरून अटक करण्यात आली आहे. इसिस या दहशतवादी संघटनेच्‍या संपर्कात असल्याच्या संशयावरुन परभणीतून शाहीद खानला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली.
मराठवाड्यातील तरुण मोठ्या प्रमाणात दहशतवादी होण्यासाठी इसिसच्या संपर्कात असल्याची माहिती एटीएसला मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी एटीएसने परभणीतून नासेरबिन चाऊसला अटक केली होती. तो इसिसच्या संपर्कात असल्याचा संशय होता. नासेरबिन चाऊसच्या चौकशीतून शाहीद खानचे नाव समोर आल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर आता एटीएसने परभणीतून शाहीद खान नावाच्या तरुणाला १ किलो स्फोटकांसह ताब्यात घेतले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2016 2:19 pm

Web Title: 24 year old youth arrested by ats fom parbhani one kg of explosives recovered
Next Stories
1 गोंदियात अल्पवयीन मुलीवरील सामूहिक अत्याचारातील पाचही आरोपींना अटक
2 सुशीलकुमारांच्या अमृतमहोत्सव खर्चावरून सोलापूर तापले
3 लैंगिक अत्याचार करणाऱ्या तिघांना बांदा येथे अटक
Just Now!
X