News Flash

महाराष्ट्रात २४३६ नवे करोना रुग्ण, ६० मृत्यू, संख्येने ओलांडला ५२ हजारांचा टप्पा

मागील २४ तासांमध्ये ११८६ रुग्णांना डिस्चार्ज

नोव्हाव्हॅक्सला लस संशोधनासाठी डॉलरच्या स्वरुपात मोठा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. नोव्हाव्हॅक्सने आधी प्राण्यांवर लसीची चाचणी घेतली.

महाराष्ट्रात २४३६ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या ५२ हजार ६६७ इतकी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये ११८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात १५ हजार ७८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर करोनामुळे झालेल्या मृत्यूंची राज्यातली संख्या ही १६९५ झाली आहे.

सध्याच्या घडीला राज्यात ३५ हजार १७८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. १५ हजार ७८६ रुग्ण आत्तापर्यंत डिस्चार्ज मिळून घरी गेले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये ६० मृत्यू झाले आहेत त्यातले ३८ मुंबईत, ११ पुण्यात, ३ नवी मुंबईत, २ ठाण्यात, २ औरंगाबादमध्ये तर १ सोलापुरात झाला आहे. तसंच ६० मृत्यूंमध्ये ४२ पुरुष तर १८ महिला होत्या. यातले २७ जण हे ६० वर्षे आणि त्यावरील वयाचे होते. तर २९ जणांचे वय हे ४० ते ५९ इतके होते. तर तिघांचे वय ४० वर्षांपेक्षा कमी होते. जे ६० मृत्यू झाले आहेत त्यापैकी ४७ जणांना मधुमेह, हृदयरोग, ब्लड प्रेशर असे गंभीर आजार होते.

सध्याच्या घडीला ५ लाख ३० हजार २४७ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे तर ३५ हजार ४७९ जणांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले आहे अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2020 8:29 pm

Web Title: 2436 new patients of covid19 recorded in maharastra today 60 deaths and 1186 discharged today the total number of positive cases in the state rises to 52667 scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 कोल्हापूर : ६८ नव्या करोनाबाधितांची नोंद, एकूण संख्या ४०९ वर
2 चंद्रपूर जिल्ह्यातील ५० वाघांचे स्थलांतरण करणार : वनमंत्री संजय राठोड
3 महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, नारायण राणेंची राज्यपालांकडे मागणी
Just Now!
X