News Flash

संवेदनशीलता..! आईच्या उत्तरकार्यचे पंचवीस हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

धनंजय मुंडे यांच्या स्वीय साहाय्यकाची संवेदनशीलता

परळी येथील प्रशांत जोशी यांनी आपल्या आईच्या निधनानंतर परंपरेनुसार गंगापुनाचा कार्यक्रम रद्द करूण उत्तरकार्यासाठीचा खर्चाची पंचवीस हजार रूपयांची मदत थेट करोना महामारी निवारणासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीस दिली. प्रशांत जोशी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची स्वीय साहाय्यक आहेत.

बीडसह, महाराष्ट्रात करोना विषाणूचां संसर्ग रोखण्यासाठी सरकारने,प्रशासन आणि समाजातील सर्व घटक लढत आहेत. टाळेबंदी ही आता तीन मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. या पार्शभूमीवर राज्य सरकारने करोना महामारीशी लढताना समाजातील लोकांनी सरकारला आर्थिक मदतही करावी असे आव्हान केले आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी समजातील छोटे-छोटे घटक आपल्या परीने मदत करत सामाजिक न्याय मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांच्या आई इंदुबाई भास्कराव जोशी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने 2 एप्रिल रोजी निधन झाले. हिंदू परंपरेनुसार उत्तर कार्य म्हणुन गंगापूजन गोड जेवणाचा कार्यक्रम केला जातो मात्र जोशी कुटुंबीयांनी हा घरच्या घरी करूण, या कार्यक्रमासाठी चा पंचवीस हजार रुपये खर्चाची रक्कम करोसाठी उभा करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली आहे. जोशी कुटुंबीयांच्या या संवेदनशील ते बाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 8:01 am

Web Title: 25 thousand rupees to the chief ministers assistance fund nck 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus Live Updates: ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’बाबत भारताचा मोठा निर्णय
2 ३ मेनंतरच मासेमारी?
3 बँकांच्या दारात वयोवृद्धांची गर्दी
Just Now!
X