News Flash

सोलापूर: ग्रामीण भागात २६० रूग्णांची नोंद; मंगळवेढ्यात न्यायाधीशाला करोनाची बाधा

सोलापूर शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्णांच्या संख्येत होतेय झपाट्याने वाढ

सोलापूर शहराच्या तुलनेत जिल्हा ग्रामीण भागात करोनाबाधित रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आज एकाच दिवशी नवीन २६० बाधित रूग्णांची भर पडली. त्यामुळे रूग्णसंख्या १,८२३ वर पोहोचली तर मृत्युचा आकडा ४४ वर पोहोचला. मंगळवेढा येथे उपकारागृहातील २८ कच्चे कैदी बाधित झाल्याची घटना ताजी असताना याच मंगळवेढ्यात एका न्यायाधीशालाही करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

शहरात आतापर्यंत ३,७०२ एवढी रूग्णसंख्या झाली असताना त्या तुलनेत आता ग्रामीण भागातही रूग्णसंख्या वेगाने वाढली आहे. शहर व जिल्ह्यात मिळून एकूण ५ हजार ५२५ वर गेली आहे. तर मृत्युची संख्याही ३६६ झाली आहेत. यात शहरातील मृत्यू ३२२ आहेत.

जिल्हा ग्रामीणमध्ये आज सर्वाधिक ५२ बाधित रूग्ण बार्शीत आढळून आले. तर अक्कलकोट व माळशिरसमध्ये प्रत्येकी ४४ बाधित रूग्णांची भर पडली. मोहोळमध्ये ४० तर पंढरपुरात ३० नवे रूग्ण सापडले. एकूण नव्या बाधित २६० रूग्णांमध्ये १०१ महिलांचा समावेश आहे.

आजच्या वाढलेल्या रूग्णसंख्येनंतर जिल्ह्यात सर्वाधिक ४१४ रूग्णसंख्या बार्शीतील आहे. तर आतापर्यंत सर्वात पुढे राहिलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यात ४०७ रूग्ण आढळून आले आहेत. अक्कलकोटमधील रूग्णसंख्या ३२६ झाली आहे. उत्तर सोलापूर १५२, मोहोळ १४१, पंढरपूर १३५, माळशिरस ७६, माढ्यात ७३ रुग्णांची नोंद झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 9:49 pm

Web Title: 260 patients registered in solapur rural areas a judge became corona infected from mangalvedha aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अमरावती विभागात दहावी, बारावीच्या वर्गाचा प्रयोग
2 रायगड जिल्ह्यात करोनाचे ५२४ नवे रुग्ण; बाधितांची एकूण संख्या पोहोचली दहा हजारांवर
3 दारु पिऊन मारहाण करणाऱ्या मुलाची आई-वडिलांनी सुपारी देऊन घडवली हत्या
Just Now!
X