कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकूळ) च्या  निवडणुकीतील मतदार यादी निश्चितीसाठी ठराव दाखल करण्याच्या प्रक्रियेत एकूण ३२६३ सभासद संस्थापकी ३२६२ संस्थांनी सहनिबंधक दुग्ध कार्यालयात ठराव दाखल केले असून करवीर तालुक्यातील पाडळी बुद्रुक येथील एकमेव संस्थेचा ठराव दाखल झाला नाही, तर अवघे ८ ते १० संस्थांकडूनच दुबार ठराव आले आहेत. ठराव दाखल होण्याची प्रक्रिया पाहता सत्तारुढ गटाने निवडणुकीपूर्वीच दूध संस्थेवर वर्चस्व ठेवण्याची पूर्ण तयारी केल्याचे दिसते.
गोकूळच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये सभासद संस्थांचे ठराव दाखल करून घेणे, त्याची छाननी करून अंतिम यादी प्रसिध्द करणे यासाठी आज ठराव दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत एकूण पात्र ३२६३ सभासद संस्थांपकी ३२६२ संस्थांचे ठराव दाखल झाले आहेत. गेल्या तीन दिवसात ठराव दाखल करण्याला वेग आला होता. त्यामध्ये प्रामुख्याने सत्तारुढ गटातील संचालकांनी आपल्यामार्फत ठराव यावेत यासाठी प्रयत्न करून गठ्ठय़ाने ठराव प्रथम आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडे व त्यानंतर सहनिबंधक दुग्ध कार्यालयात दाखल केले. ३२६२ पकी २६०० च्यावर ठराव सत्तारुढ गटाच्या नेत्याकडे सुपूर्द केल्याने ही निवडणूक एकतर्फी होईल असे चित्र निर्माण झाले आहे.
सभासद संस्थांनी दाखल केलेल्या ठरावाची छाननी होऊन त्याची कच्ची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यावर दुरूस्ती व हरकती मागवण्यात येणार आहेत.
हरकतींवरील सुनावणी व निर्णय झाल्यानंतर पक्की यादी प्रसिध्द होईल. दरम्यान  संपूर्ण जिल्’ाातून केवळ एकाच संस्थेकडून ठराव आला नाही. ही संस्था करवीर तालुक्यातील पाडळी बुद्रुक येथील वीर हनुमान दुग्ध व्यावसायिक संस्था आहे. या संस्थेचे नेतृत्व गोकूळचे संस्थापक संचालक हरी रामजी गायकवाड हे करीत आहेत. पण त्याचे सुपुत्र व पुतणे यांच्यातील वादामुळे ठराव कोणाच्या नावाने द्यायचा याबाबत शेवटपर्यंत एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे या संस्थेचा अंतिम वेळेपर्यंत ठराव दाखल झाला नाही.
निवडणुकीसाठी केवळ ८ ते १० ठराव दुबार आले आहेत. त्याबाबत तपासणी करून पात्र ठरावधारक निश्चित करण्यात येणार असून अपात्र ठरावधारकांवर फौजदारी कारवाई होऊ शकते