रायगड जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने सुरुच झाला आहे. गेल्या चोवीस तासात तब्बल २६२ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या ५ हजार ३३५ वर पोहोचली आहे. दिवसभरात १३१ जणांनी करोनावर मात केली आहे. तर गुरुवारी उपचारादरम्यान पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात २६२ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात  पनवेल मनपा हद्दीतील १४५, पनवेल ग्रामिणमधील ३९, उरणमधील २३, खालापूर १०, कर्जत ६, पेण ९, अलिबाग ६, माणगाव ४, रोहा १०, श्रीवर्धन ७, महाड २ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा, उरण, कर्जत, खालापूर, मुरुड प्रत्येकी १ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात १३१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील १९ हजार ८०६ जणांची करोना चाचणी करण्यात आली. यातील ५ हजार ३३८ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर १९३ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. २९०५ जणांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात सध्या २ हजार २७६ करोनाबाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील ११४६, पनवेल ग्रामिण हद्दीतील ४४२, उरणमधील ९८,  खालापूर १११, कर्जत ५३, पेण ९३, अलिबाग ७४,  मुरुड २१, माणगाव ५३, तळा येथील २, रोहा ११८, सुधागड ५, श्रीवर्धन २२, म्हसळा ८, महाड २५, पोलादपूरमधील ५ करोना बाधितांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्के ५४ टक्के आहे.

जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवीमुंबई प्रमाणे रायगड जिल्ह्यातही प्रतिंबधात्मक उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.