News Flash

रायगड जिल्ह्यात करोनाचे २६३ नवे रुग्ण, बाधितांची संख्या ३९०० च्याही पुढे

दिवसभरात १४२ जणांची करोनावर मात

संग्रहित छायाचित्र

लोकसत्ता, खास प्रतिनिधी
अलिबाग- रायगड जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या चोवीस तासात तब्बल २६३ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या ३ हजार ९४६ वर पोहोचली आहे. दिवसभरात १४२ जणांनी करोनावर मात केली आहे. तर मंगळवारी उपचारा दरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात २६३ नव्या करोना बाधितांची भर पडली आहे. यात  पनवेल मनपा हद्दीतील १२७, पनवेल ग्रामिण मधील ५४, उरण मधील १२, खालापूर २१, कर्जत ३, अलिबाग २३, मुरूड १, रोहा १६ महाड ६ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीतील १ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात १४२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील ९३१६ जणांची करोना चाचणी करण्यात आली. यातील ५१८७ जणांचे अहवाल नकारात्मक आले. ३९४६ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर १८३ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. २३३७ जणांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार ४७५ करोना बाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील ७३२, पनवेल ग्रामिण हद्दीतील ३३८, उरण मधील ५९,  खालापूर ६३, कर्जत ५८, पेण ४८, अलिबाग ५६,  मुरुड ९, माणगाव २८, तळा येथील २, रोहा ५३, सुधागड १, श्रीवर्धन ११, म्हसळा ०, महाड १४, पोलादपूर मधील ३ करोना बाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात आत्ता पर्यंत १३४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांच्या संपर्कात आलेले ८४ हजार ६५६ जणांना सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरवात झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 9:20 pm

Web Title: 263 new corona positive patients in raigad district total cases 3946 till date scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अकोल्यात करोनामुळे आणखी दोन मृत्यू; १४ नवे रुग्ण
2 महाराष्ट्रात ४ हजार ८७८ नवे करोना रुग्ण, २४५ मृत्यू
3 सत्तेत आल्यापासून शिवसेनेच्या संवेदना गोठल्या-प्रवीण दरेकर
Just Now!
X