News Flash

महाराष्ट्रात गेल्या १७ वर्षात २६,३३९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

राज्य सरकारची नागपूरच्या विधीमंडळात माहिती

छायाचित्र प्रातिनिधीक

महाराष्ट्रात जानेवारी २००१ पासून ऑक्टोबर २०१७ या १७ वर्षांच्या कालावधीत २६ हजार ३३९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यांपैकी १२ हजार ८०५ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती राज्य सरकारने अधिवेशनादरम्यान आज विधानसभेत दिली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, या वर्षी १ जानेवारी ते १५ ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यातील ५८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये एकट्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक ११५ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 5:27 pm

Web Title: 26339 maharashtra farmers committed suicide in last 17 years says govt
Next Stories
1 मुंबई आग्रा मार्गावर रायफल, बंदुका आणि काडतुसांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
2 कागलमधील अपघातप्रकरणी अजिंक्य राहणेच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल
3 शिवसेना वर्षभरात सरकारमधून बाहेर पडून स्वबळावर सत्तेवर येईल- आदित्य ठाकरे
Just Now!
X