26 February 2021

News Flash

रायगड जिल्ह्य़ात करोनाचे २७३ नवीन रुग्ण

१९१ रुग्ण करोनामुक्त, आठ जणांचा मृत्यू

प्रतिकात्मक छायाचित्र

रायगड जिल्ह्यात करोनाबाधितांचा आकडा सहा हजारांच्या पार गेला आहे. गेल्या २४ तासांत करोनाचे २७३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात १९१ जणांनी करोनावर मात केली आहे. चिंताजनक बाब म्हणजे  आठ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या २ हजार ४३० करोनाचे रुग्ण आहेत. तर ३ हजार ४९८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वेगाने सुरुच आहे. गेल्या चोवीस तासांत तब्बल २७३ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ६ हजार ०५७ वर पोहोचली आहे. २९८ जणांचे तपास अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

जिल्ह्यात २७३ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात पनवेल मनपा हद्दीतील ९३, पनवेल ग्रामिणमधील ३१, उरणमधील २२, खालापूर २४, कर्जत २५, पेण ३८, अलिबाग ०७, मुरुड १, माणगाव १०, तळा १, रोहा ९, श्रीवर्धन २, म्हसळा ०, महाड ९ पोलादपूर १ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा ३, खालापूर २, पेण २,उरण येथे एका रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात १९१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील २३ हजार २६३ जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सध्या २ हजार ४३० करोना बाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील ११६३, पनवेल ग्रामिण हद्दीतील ३५७, उरण मधील १३४,  खालापूर १५८, कर्जत ६९, पेण १४१, अलिबाग १३४,  मुरुड २४, माणगाव ५२, तळा येथील २, रोहा ९३, सुधागड १, श्रीवर्धन ३६, म्हसळा २२, महाड ४२, पोलादपूर मधील २ करोना बाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत १७९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्के ५७ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के टक्के आहे.

जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढण्यास सुरवात झाली आहे. पनवेल, उरण, पाठोपाठ, अलिबाग, पेण, कर्जत, खालापूर आणि रोहा तालुक्यात रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 12:15 am

Web Title: 273 new corona patients in raigad district abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 धुळे जिल्ह्य़ातील करोनाग्रस्त मृत्यूंची संख्या ७२वर
2 बंदुकीसह ‘टिकटॉक’वरील दर्शन तरुणाला महागात; तिघांना अटक
3 बांबूच्या पर्यावरणपूरक राख्या बाजारात
Just Now!
X