02 March 2021

News Flash

रायगड जिल्ह्यात करोनाचे २९९ नवे रुग्ण

४०६ रुग्ण करोनामुक्त, ९ जणांचा मृत्यू

प्रतीकात्मक छायाचित्र

रायगड जिल्ह्यात मंगळवारी २९९ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले. तर ४०६ जण उपचारानंतर पूर्ण बरे झाले. दिवसभरात ९ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

सध्या ३ हजार ५५८ करोनाचे रुग्ण आहेत. तर ७ हजार २९३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर २९३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ११ हजार १४४ वर पोहोचली आहे. ५१३ जणांचे तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

जिल्ह्यात २९९ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात  पनवेल मनपा हद्दीतील ११२, पनवेल ग्रामिणमधील ४४, उरणमधील १६, खालापूर ३८, कर्जत ४, पेण १८, अलिबाग ४४, मुरुड २, तळा १, रोहा १६, श्रीवर्धन १, महाड ३ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीत ३, उरण ३, खालापूर १, अलिबाग १, रोहा १ अशा ९ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात ४०६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यातील ३७ हजार २४४ जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ५५८ करोनाबाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १ हजार ४३५, पनवेल ग्रामिण हद्दीतील ४९५, उरणमधील १६२, खालापूर ३४३, कर्जत ७८, पेण ३७०, अलिबाग ३६८,  मुरुड २३, माणगाव ५१, तळा येथील २, रोहा ७८, सुधागड २, श्रीवर्धन २८, म्हसळा ५५, महाड ६३, पोलादपूरमधील ५ करोनाबाधितांचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्कवारी ६५ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के आहे.

कोव्हीड केअर सेंटर मध्ये ५५४, डेडिकेटेड कोव्हीड केअर सेंटर मध्ये ५३८, डेडिकेटेड कोव्हीड केअर हॉस्पीटलमध्ये २०२ तर गृह विलगीकरणात २ हजार ३८८ लोकांवर उपचार सुरु आहेत.

महाड तालुक्यात मंगळवारी तीन नव्या रुग्णांची नोंद झाली. यामध्ये महाड शहरातील एका वृद्धाचा त्याच प्रमाणे आसनपोई आणि शिंदेकोंड येथील दोन तरुणांचा समावेश आहे. हे दोन्ही तरुण सिक्वेंट सायंटिफिक या कारखान्यातील कामगार आहेत.

आता महाड तालुक्यातील रुग्णसंख्या २०४ इतकी झाली असून त्यातील ६३ जणावर उपचार सुरु आहेत.  मंगळवारी २२ रुग्णांना घरी सोडण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 12:18 am

Web Title: 299 new corona patients in raigad district abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 बोडणी गावात करोनाचे ७७ रुग्ण
2 वर्षभरानंतर चिमुकलीच्या अपहरणकर्त्यांचे रेखाचित्र तयार
3 फांदी तोडल्याने २४ पेक्षा अधिक बगळ्यांच्या पिलांचा मृत्यू
Just Now!
X