News Flash

देणारे तिघे आणि घेणारा सराफही जेरबंद

स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून लूटमार करण्याच्या जिल्हय़ात घटना पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. या आमिषाला बळी पडणाऱ्यांविरुद्ध पोलीस यापूर्वी कारवाई करत नव्हते.

| May 24, 2015 03:15 am

देणारे तिघे आणि घेणारा सराफही जेरबंद

स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून लूटमार करण्याच्या जिल्हय़ात घटना पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. या आमिषाला बळी पडणाऱ्यांविरुद्ध पोलीस यापूर्वी कारवाई करत नव्हते. जिल्हय़ात प्रथमच आमिष दाखवणाऱ्याबरोबरच आमिषाला बळी पडलेला अशा दोन्ही बाजूंवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई एमआयडीसी पोलिसांनी केली आहे. पोलिसांच्या या कारवाईत पुण्यातील सराफ आणि त्याला लुटण्याचा प्रयत्न करणारे तिघे असे एकूण चौघे पकडले गेले.
स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून लूटमार करण्याच्या घटना पोलिसांमध्ये ‘ड्रॉप’ म्हणून ओळखल्या जातात. शुक्रवारी सायंकाळी, शहरालगतच्या वडगाव गुप्ता शिवारात शेंडी बायपासजवळ पोलिसांच्या सतर्कतेने ही घटना उघडकीला आली. अन्यथा पुण्यातील सराफाकडील रक्कम लुटली गेली असती. पोलीस कर्मचारी योगेश ठाणगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सराफ व्यावसायिक लतेश सिवलाल सोनी (रा. रस्तापेठ) यांना चोरीचे सोने घेतल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. तर सोनी यांना लुटण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून कणगर परसराम काळे (रा. वडगाव गुप्ता, नगर), विनायक सोनाजी वाघमारे (ठाणे) व बाबासाहेब दिनकर मोरे (ठाणे) या तिघांना अटक करण्यात आली आहे. यातील कणगर काळे याच्याविरुद्ध पोलिसांकडे अनेक गुन्हय़ांची नोंेद आहे.
पोलीस शिपाई ठाणगे व त्यांचे सहकारी शुक्रवारी सायंकाळी गस्त (बीट मार्शल) घालत असताना बाहय़वळण रस्त्याजवळ एक जण मारुती मोटार उभी करून काटवनात जाताना दिसला व काही अंतरावर चौघे उभे होते, त्यातील एक जण कणगर काळे होता. त्यामुळे पोलिसांना ‘ड्रॉप’चा संशय आल्याने त्यांनी ही माहिती सहायक निरीक्षक राहुल पवार यांना कळवली. ते कुमक घेऊन लगेच तेथे आले, तेव्हा सोनी यांची चौघांशी झटापट सुरू असल्याचे दिसले. पोलिसांना पाहताच एक जण पळून गेला, मात्र सोनीसह इतर तिघे जागेवरच पकडले गेले. सोनी याने सोने खरेदीसाठी ४० हजार रुपये आणले होते. तेही पोलिसांनी जप्त केले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत सोनी याने दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी इतर चौघांकडून आमिष दाखवलेल्या सोन्यातील, दोन ग्रॅम नमुना सोने खरेदी केले होते. अट्टल गुन्हेगार कणगर काळे याच्याकडील हे चोरीचे सोने आहे, हे माहीत असूनही सोनी याने ते खरेदी केल्याने पोलिसांनी त्यांच्याहीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. ड्रॉपच्या घटनेत आमिषाला बळी पडणाऱ्या व्यक्तीविरुद्ध प्रथमच गुन्हा दाखल झाला आहे. अनेक घटनांमध्ये सोने खरेदीसाठी आणलेली मोठी रक्कम लुटली जाते, मात्र या रकमेचे स्पष्टीकरण देता येत नसल्याने तक्रारी दिल्या जात नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2015 3:15 am

Web Title: 3 brigand arrested with jeweller
Next Stories
1 काँग्रसने सत्तेचे दलाल तयार केले- मुख्यमंत्री
2 दुधनाच्या डाव्या-उजव्या कालव्यातून पाणी सोडले
3 कुटुंबावरील कर्जाला कंटाळून नवविवाहित तरुणाची आत्महत्या
Just Now!
X