News Flash

ट्रक उलटल्याने ३ कामगार ठार, ४ जण जखमी

ग्रामस्थांनी आपल्या गाडय़ांमधून जखमींना रुग्णालयापर्यंत पोचवले.

रत्नागिरी : तालुक्यातील मावळंगे नातुंडेवाडी येथे चिरे (बांधकामाचा दगड) वाहतूक करणारा ट्रक झाडाच्या फांदीला घासून पलटी झाल्यामुळे ट्रकमधील तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर गाडीमालकासह चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.  शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये अजय अनंत लाखण, सुधाकर कृष्णा लाखण या सख्ख्या चुलत भावांसह गोरक्ष काळे (सर्व रा. शिवार, आंबेरे) या तिघांचा मृत्यू ओढवला, तर ओमकार विश्वनाथ खानविलकर, सूर्यकांत गोविंद पाजवे, यशवंत गोसावी आणि दिलीप नमसले हे चौघे जखमी झाले आहेत.

पावसनजीकच्या मावळंगे नातुंडेवाडी येथून विश्वनाथ खानविलकर यांच्या मालकीच्या ट्रकमधून चिरे भरून ते मोरया सडा येथे जात होते. या वेळी मार्गावर नातुंडेवाडीजवळ वळणावर चिरे घेऊन जाणाऱ्या ट्रकला आंब्याच्या झाडाची फांदी लागली. झाडाच्या फांदीच्या धडकेने ट्रक रस्त्यावरून खाली उतरला आणि या वेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक एका बाजूला  उलटला. त्यानंतर गाडी रस्त्याच्या खाली कोसळली. ट्रकमध्ये एकूण सात जण होते. ट्रकच्या हौदामध्ये काही कामगार बसले होते. ट्रक पलटी झाल्याने ट्रकच्या हौद्यात चिऱ्यावर बसलेल्या तिघा कामगारांच्या अंगावरच चिरे कोसळले.

जखमींपैकी पाचवे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. अपघातानंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. ग्रामस्थांनी आपल्या गाडय़ांमधून जखमींना रुग्णालयापर्यंत पोचवले. अपघाताचे वृत्त शिवारआंबेरे परिसरात पोहोचताच गावातील ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. ट्रक नेमका कोण चालवत होता, हे संध्याकाळी उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2019 4:11 am

Web Title: 3 workers killed 4 injured three workers after truck overturned zws 70
Next Stories
1 राज्यातील विद्यार्थी संख्येत १.५३ लाखांनी घट
2 महापुराचा दूध उत्पादनालाही फटका
3 घोडेबाजार अद्याप कायम ; नारायण राणे यांचे सूचक वक्तव्य
Just Now!
X