जालना नगरपालिकेतील ३५३ सफाई कामगारांपैकी शंभरपेक्षा अधिक कामगार प्रत्यक्षात पहारेकरी, वाहनचालक आणि अन्य काम करतात. नगरपालिकेतील सफाई कामगार आणि कर्मचारी संघटनेनेच ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.
संघटनेने म्हटले आहे की, काही सफाई कामगार आदेश नसतानाही घंटागाडय़ांवर वाहनचालक म्हणून काम करीत आहेत. नगरपालिकेचे लेखी आदेश नसतानाही पहारेकरी तसेच शिपायांची कामे करीत आहेत. अन्य काम करणाऱ्या या कामगारांना शहर स्वच्छतेच्या कामासाठी लावण्याची आवश्यकता आहे.
नगरपालिकेत निकषाप्रमाणे सफाई कामगारांची पदे भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे वेळोवेळी स्वच्छतेसाठी तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटदारामार्फत मजूर लावण्यात आलेले आहेत. शहर विस्ताराच्या तुलनेत आवश्यक असलेले सफाई कामगार आस्थापनेवर नसताना प्रत्यक्षात असलेले कामगारही मोठय़ा प्रमाणावर अन्यत्र कामावर आहेत. नगरपालिका प्रशासनातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आशीवार्दामुळे ११० सफाई कामगार अन्यत्र काम करीत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. शहरातील सफाईसाठी सहा विभाग असून प्रत्येक ठिकाणी एका स्वच्छता निरीक्षकाच्या निगराणीखाली काम चालते. शंभरपेक्षा अधिक सफाई कामगार अन्यत्र काम करीत असल्याने त्याचा परिणाम शहरातील स्वच्छतेवर होत आहे. सर्व सफाई कामगार त्यांच्या मूळ कामावर असणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
BJP, online advertisements, Phir Ek Bar,
‘फिर एक बार’साठी तीन महिन्यांत ३८ कोटींचा खर्च, ऑनलाइन जाहिरातींमध्ये भाजपचाच वाटा मोठा, २०१९च्या तुलनेत तिप्पट वाढ
police maharashtra
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी पोलीस कर्मचारी ‘घरगडी’! राज्यभरात तीन हजारांवर पोलीस…
Women officers and employees are fully responsible for voting stations where number of women voters is more than men
महिलांच्या हाती मतदान केंद्राची दोरी…