03 June 2020

News Flash

रायगड जिल्ह्यात करोनाचे ३० बळी

करोनाबाधितांचा आकडा ६५३

संग्रहित छायाचित्र

रायगड जिल्ह्यात करोनाची लागण झाल्याने आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासांत ३० करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे करोनाबाधितांचा आकडा ६५३ वर पोहोचला आहे.

जिल्ह्यात ३० नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात पनवेल मनपा हद्दीतील १४, पनवेल ग्रामिणमधील ६, उरणमधील २, अलिबाग ३, मुरुड १, श्रीवर्धन ३, म्हसळा १ मधील एका रुग्णाचा समावेश आहे. पनवेल येथे १, श्रीवर्धन २ तर म्हसळा येथील एका रुग्णाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात ४७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील २४६५ जणांची करोनाचाचणी करण्यात आली. यातील १७४२ जणांचे अहवाल नकारात्मक आले. ६५३ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर ७० जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. ३१७ जणांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या ३०६ करोनाबाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १३५, पनवेल ग्रामिण हद्दीतील ६७, उरणमधील ८१, पेण ३, अलिबाग ४, श्रीवर्धन येथील २, मुरुड १, कर्जत १, खालापूर १, माणगाव १०, महाड २ आणि म्हसळा येथील एका करोनाबाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात ३०९ जणांचे संस्थात्मक अलगीकरण तर १३ हजार ०९६ जणांचे घरात अलगीकरण करण्यात आले आहे. तर करोनाबाधितांच्या संपर्कात आलेले २५ हजार ४४८ जणांना सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 12:54 am

Web Title: 30 victims of corona in raigad district abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 जळगावमध्ये करोना संशयितांचे ७८ अहवाल नकारात्मक
2 रत्नागिरी जिल्ह्यात एसटी प्रवासाला अत्यल्प प्रतिसाद
3 नगरमधील करोना प्रयोगशाळेला ‘आयसीएमआर’ची मान्यता
Just Now!
X