News Flash

SEX साठी नकार दिला म्हणून ३० वर्षाच्या तरुणाने ६० वर्षाच्या महिलेची केली हत्या

वाटेत त्याने मद्यपान केले.

प्रतिनिधिक छायाचित्र

सेक्ससाठी नकार दिला म्हणून ३० वर्षाच्या तरुणाने ६० वर्षाच्या वृद्धेची हत्या केली. पालघर जिल्ह्याच्या तलासरीमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. लक्ष्मण खारपाडे (३०) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मण सोमवारी रात्री गोवरसीपाडा येथे एका कार्यक्रमासाठी गेला होता. कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना वाटेत त्याने मद्यपान केले. तलासरी येथे आल्यानंतर लक्ष्मणची नजर जिल्हा परिषदेच्या शाळेतील वहांऱ्डयात झोपलेल्या लकमी धोनदाडे (६०) या महिलेवर पडली.

हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार मद्याच्या नशेत असलेला लक्ष्मण महिलेजवळ गेला व तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. लक्ष्मणची मागणी ऐकून लकमीला संताप अनावर झाला. मी तुझ्या आईच्या वयाची आहे याच जरा भान बाळग असे लकमीने त्याला सुनावले. तलासरीच्या पोलीस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली. लकमीने कानउघडणी केल्याने संतापलेल्या लक्ष्मणने त्याचा पट्टा काढला व लकमीला मारहाण सुरु केली.

त्यानंतर त्याने दगडाने ठेचून लकमीची हत्या केली. लक्ष्मण निर्जन स्थळी लकमीचा मृतदेह टाकून पळत असताना स्थानिकांनी त्याला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. खारपाडेवर हत्येचे कलम ३०२ लावण्यात आले आहे. ज्या दगडाने त्याने लकमीची हत्या केली तो दगडही फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 4:04 pm

Web Title: 30 year old man kills 60 year old for refusing sex
Next Stories
1 ठाणे जिल्ह्यतील शेतकरी ‘समृद्धी’च्या वाटेवर
2 पक्ष्यांना उष्माघाताचा फटका
3 ‘ठाण्याचे आयुक्त हुकूमशहा!’
Just Now!
X