लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : जिल्ह्यात ३३ नवीन करोनाबाधित रुग्ण सोमवारी आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ३०५३ झाली. आतापर्यंत जिल्ह्यात ११६ करोनाबळी गेले आहेत.

जिल्ह्यातील एकूण ४३३ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ४०० अहवाल नकारात्मक, तर ३३ अहवाल सकारात्मक आले. सध्या ५१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये पुनोती सहा, रिधोरा चार, अकोट, जठारपेठ, हिवरखेड येथील प्रत्येकी तीन जण, बार्शिटाकळी येथील दोन जण तर उर्वरित शिवणी, गोरक्षण रोड, गिता नगर, केळकर रुग्णालय, सुधीर कॉलनी, मोठी उमरी, माना, पातूर, सिव्हील लाईन, पिंपरी, दहिगाव गावंडे व वाल्पी येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. दरम्यान, आज दुपारनंतर शासकीय वैद्याकीय महाविद्याालयातून तीन, खासगी रुग्णालय व हॉटेलमधून सात असे एकूण दहा जण करोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातील २४२५ जण करोनामुक्त झाले आहेत.