28 September 2020

News Flash

सिंधुदुर्गात ३३९ रुग्ण करोनामुक्त

जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या ४५१

प्रतिकात्मक छायाचित्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारी बांदा येथील ४२ वर्षीय करोनाबाधीत व्यक्तीचा मृत्यू झाला. करोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या ७ झाली आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ३३९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या ४५१ झाली आहे. सद्य्स्थितीत जिल्ह्यात १०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी आणखी १७  व्यक्तींचे करोना तपासणी आहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील १०, देवगड तालुक्यातील ३ , मालवण तालुक्यातील २ , सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

जिल्ह्यात सध्या जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग, उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी, कणकवली, ग्रामीण रुग्णालय मालवण,देवगड, वेंगुर्ला, दोडामार्ग, वैभववाडी, खारेपाटण तपासणी नाका आणि फोंडाघाट तपासणी नाका अशा १० ठिकाणी  कोविड स्वॅब संकलन केंद्र सुरु आहेत. तसेच ग्रामीण रुग्णालय, मालवण, देवगड, दोडामार्ग, वैभववाडी, खारेपाटण व फोंडाघाट तपासणी नाका आणि उपजिल्हा रुग्णालय कणकवली अशा ७ ठिाकणी रॅपिट अ‍ॅन्टीजेन टेस्ट सेंटर सुरु आहे.   शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या व्यक्ती आणि करोनाची लक्षणे जाणवणाऱ्या व्यक्तींनी कार्यरत असलेल्या टेस्टींग सेंटरवर तपासणी करावी. असे आवाहान  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चाकूरकर यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 12:27 am

Web Title: 339 patients corona free from sindhudurg abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 रायगड जिल्ह्यात सरासरीच्या ६५ टक्के पाऊस
2 पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवणारे कलाकार अडचणीत
3 जालना जिल्ह्य़ात ८४ करोना बळी
Just Now!
X