28 October 2020

News Flash

साखर कारखान्याच्या चिमणीवरून उडी मारुन शेतकऱ्याची आत्महत्या

अंजनगाव सुर्जीत राहणारा सचिन बुधवारी पहाटे घरातून दुचाकीवरुन निघाला. यानंतर दुपारी गावाजवळील अंबादेवी सहकारी साखर कारखान्याजवळ सचिनची दुचाकी दिसली.

(संग्रहित छायाचित्र)

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील अंबादेवी सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीवरुन उडी मारुन एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. सचिन अर्जुन भोंडे (वय ३४) असे या शेतकऱ्याचे नाव असून शेतीच्या वादातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.

अंजनगाव सुर्जीत राहणारा सचिन बुधवारी पहाटे घरातून दुचाकीवरुन निघाला. यानंतर दुपारी गावाजवळील अंबादेवी सहकारी साखर कारखान्याजवळ सचिनची दुचाकी एका ग्रामस्थाला दिसली. हा कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून बंद स्थितीत आहे. संशय आल्याने ग्रामस्थाने याची माहिती सचिनच्या कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी ग्रामस्थांच्या मदतीने सचिनचा शोध घेतला असता कारखान्याच्या चिमणीजवळ त्याचा मृतदेह सापडला. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

सचिनने चिमणीवरुन उडी मारुन आत्महच्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. शेतीच्या जागेवरून शेजारच्या शेतकऱ्यासोबत वाद असल्याने सचिनने आत्महत्या केली असावी, असा अंदाज असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2018 2:41 am

Web Title: 34 year old farmer committed suicide in amravati
Next Stories
1 प्राध्यापक भरती बंदीमुळे ‘नॅक’ मानांकन मिळणे अशक्य
2 मनुष्य – प्राणी संघर्षांत सात वर्षांत २६२ जणांचा बळी
3 मोदी, उद्धव यांच्या सभांनी वातावरणनिर्मिती
Just Now!
X