रायगड जिल्ह्यात शुक्रवारी ३५१ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले. तर ३७० जण करोनामुक्त झाले आहेत. तर चार जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नवीन रुग्ण संख्येच्या तुलनेत जास्त आहे.

सध्या ३ हजार ४७८ करोनाचे रुग्ण आहेत. तर ६ हजार २२५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर २६० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ९ हजार ९६३ वर पोहोचली आहे. ७४६ जणांचे तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

जिल्ह्यात ३५१ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात पनवेल मनपा हद्दीतील १२५, पनवेल ग्रामिणमधील ५८, उरणमधील २९, खालापूर ४५, कर्जत ९, पेण ३२, अलिबाग ३५, श्रीवर्धन २, महाड १६ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीत २, पनवेल ग्रामिण १, महाड १, अशा ४ जणांचा येथे रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३७० जणकरोना मुक्त झाले आहेत.

जिल्ह्यातील ३३ हजार ३५० जणांची करोनाचाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ४७८ करोनाबाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १ हजार ३९४, पनवेल ग्रामिण हद्दीतील ४८०, उरणमधील १५८, खालापूर ३२९, कर्जत १००, पेण ३८५, अलिबाग ३३३, मुरुड ५६, माणगाव ३७, तळा येथील २, रोहा ६०, सुधागड १, श्रीवर्धन ३६, म्हसळा ४८, महाड ५१, पोलादपूरमधील ८ करोनाबाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्के ६२ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के टक्के आहे.