रायगड जिल्ह्यात सोमवारी ३५८ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले. तर ४१० जण उपचारानंतर पूर्ण बरे झाले. दिवसभरात ७ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सध्या ३ हजार ६७४ करोनाचे रुग्ण आहेत. तर ६ हजार ८८७ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. तर २८४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १० हजार ८४५ वर पोहोचली आहे. ५१३ जणांचे तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. जिल्ह्यात ३५८ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात  पनवेल मनपा हद्दीतील ११२, पनवेल ग्रामिणमधील ४६, उरणमधील १४, खालापूर ३०, कर्जत ७, पेण २६, अलिबाग ५१, मुरुड ३, माणगाव ७, रोहा २१, सुधागड २, श्रीवर्धन २, म्हसळा १, महाड ३५ पोलादपूर १ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीत ४, उरण १, अलिबाग १, मुरुड १ अशा ७ जणांचा येथे रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात ४१० जण करोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील ३६ हजार २०१ जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे.  जिल्ह्यात सध्या ३ हजार ६७४ करोना बाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १ हजार ४६३, पनवेल ग्रामिण हद्दीतील ५०२, उरण मधील १६४, खालापूर ३३१, कर्जत ९२, पेण ४२०, अलिबाग ३४६,  मुरुड ३७, माणगाव ५४, तळा येथील १, रोहा ७९, सुधागड ३, श्रीवर्धन ३७, म्हसळा ५५, महाड ८२, पोलादपूरमधील ८ करोनाबाधितांचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्के ६३ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के टक्के आहे.

कोव्हीड केअर सेंटर मध्ये ५१८, डेडिकेटेड कोव्हीड केअर सेंटर मध्ये ५३२, डेडिकेटेड कोव्हीड केअर हॉस्पीटलमध्ये २०६ तर गृह विलगीकरणात २ हजार ३८९ लोकांवर उपचार सुरु आहेत.

अलिबागच्या बोडणी गावात गेल्या २ दिवसात ३५ करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. रविवारी गावात १५ रुग्ण आढळून आले होते. तर सोमवारी २१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बोडणी गावत करोनाचे नवा हॉट स्पॉट बनला आहे.  महाड औद्योगिक वसाहतीत करोनाचा शिरकाव झाला आहे. आज या औद्योगिक वसाहतीमधील सिक्वेंट सायंटिफीक या कारखान्यातील १९ जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  आज या औद्योगिक वसाहतीमधील सिक्वेंट सायंटिफीक या कारखान्यातील १९ कामगार, कर्मचाऱ्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या १९ रुग्णांखेरीज महाड शहरामध्येही आज ७ नवे रुग्ण आढळले. सिक्वेंट कारखान्यात आढळलेले रुग्ण हे महाड शहरासह तालुक्यातील विविध गावांतील असल्यामुळे औद्योगिक वसाहतीमधील कारखाने संपूर्ण तालुक्यासाठीच धोकादायक झाले आहेत.

सिक्वेंट सायंटिफिक या कारखान्यात आढळलेल्या करोना रुग्णांमध्ये महाड शहरातील ७, बिरवाडी मधील ३,गोंडाळे येथील ३,कोल, चोचिंदे कोंड, बारसगांव, खैराट, मांघरुण, भिवघर ( मोहोत) या गावांतील रुग्णांचा समावेश आहे.