News Flash

खा. मुंडे यांच्याकडे ३८ कोटींची मालमत्ता

लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरताना दाखल केलेल्या शपथपत्रात भाजपचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे, पत्नी व मुलगी अशा एकत्रित कुटुंबाकडे ३८ कोटींची मालमत्ता असल्याचे विवरण देण्यात आले

| March 27, 2014 01:35 am

लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरताना दाखल केलेल्या शपथपत्रात भाजपचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे, पत्नी व मुलगी अशा एकत्रित कुटुंबाकडे ३८ कोटींची मालमत्ता असल्याचे विवरण देण्यात आले आहे. प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी उमेदवार सुरेश धस यांच्यापेक्षा मुंडेंकडे चारपट अधिक मालमत्ता आहे. मुंडे कुटुंबीयांकडे वेगवेगळ्या संस्थांचे २२ कोटी २७ लाख कर्ज असल्याचेही नोंदवण्यात आले आहे.
शपथपत्रात मुंडेंकडे ६ लाख, पत्नी प्रज्ञा मुंडे यांच्याकडे ८ लाख, मुलगी यशश्री यांच्याकडे ५ लाखांची रोकड, तर िहदू एकत्रित कुटुंबाची ८ लाखांची रोकड आहे. वेगवेगळ्या ठेवी, शेअर्स, पॉलिसी, येणे कर्ज अशी मिळून मुंडेंच्या नावावर २ कोटी ५६ लाखांची चल संपत्ती आहे. प्रज्ञा मुंडेंकडे ४ कोटी ४९ लाख, तर चल संपत्तीमध्ये यशश्री मुंडे यांच्याकडे २ कोटी ३९ लाखांची मालमत्ता असून िहदू एकत्रित कुटुंबाची मालमत्ता ४ कोटी १६ लाखांची आहे.
जमीनजुमला, जनावरे आदींच्या माध्यमातूनही मुंडे कुटुंबाची मालमत्ता मोठय़ा प्रमाणात आहे. मुंडे यांच्या नावे ७ कोटी ८९ लाख ६६ हजार ५०० रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. प्रज्ञा मुंडे यांच्या नावावर १४ कोटी २५ लाख, तर यशश्री यांच्या नावावर सव्वादोन कोटींची स्थावर मालमत्ता आहे. मुंडे कुटुंबाच्या नावावर वेगवेगळया व्यक्ती व संस्थांचे २२ कोटी २७ लाखांचे कर्जही आहे. मुंडे कुटुंबीयांकडे ५ वर्षांपूर्वीची चल संपत्ती ६ कोटींच्या घरात होती, तर स्थावर मालमत्तेची किंमत सुमारे १५ कोटींच्या आसपास होती. या संपत्तीत ५ वर्षांत लक्षणीय वाढ झाली. त्यांचे प्रतिस्पर्धी महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांच्याकडे साडेआठ कोटींची संपत्ती असून धस यांच्यापेक्षा मुंडे यांची संपत्ती चारपटीने अधिक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 1:35 am

Web Title: 38 cr property of gopinath munde
Next Stories
1 स्वतंत्र निवडणूक किंवा ‘नोटा’चा वापर
2 ‘लोकसभेतील मतांच्या आघाडीवर विधानसभेच्या उमेदवारांचे भवितव्य’
3 ‘विलास औताडेंनी २ आठवडय़ांत कार्यकर्त्यांची बैठकही घेतली नाही’
Just Now!
X