रायगड जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. दिवसभरात ३८८ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले. ३२५ जण करोनातून पुर्ण बरे झाले तर आठ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकुण करोनाबाधितांची संख्या १६ हजार ३२९ वर पोहोचली आहे. यापैकी १२ हजार ५७५ रुग्ण करोना मुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात ३८८ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात  पनवेल मनपा हद्दीतील १६६, पनवेल ग्रामिण मधील ३३, उरणमधील १३, खालापूर २८, कर्जत १२, पेण ४४, अलिबाग ३३, तळ३ ३, रोहा १९, सुधागड ३, महाड २७, पोलादपूर ३ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीत २, पनवेल ग्रामिण १, खालापूर १, पेण १, अलिबाग १, महाड १ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३२५ जण करोनातून पुर्ण बरे झाले आहेत.

जिल्ह्यातील ५२ हजार ७६१ जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ३१३ रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १ हजार ३९९, पनवेल ग्रामिण हद्दीतील ३५५, उरण मधील १७६, खालापूर २५७, कर्जत १०७, पेण २६९, अलिबाग १८७, मुरुड ५३, माणगाव ६९, तळा येथील ४, रोहा १६५, सुधागड १७, श्रीवर्धन २९, म्हसळा ७१, महाड १३५, पोलादपूर मधील २० करोना बाधितांचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्के ७७ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के टक्के आहे. कोव्हीड केअर सेंटर मध्ये ४४७, डेडिकेटेड कोव्हीड केअर सेंटरमध्ये ५५७, डेडिकेटेड कोव्हीड केअर हॉस्पीटलमध्ये २१३ तर गृह विलगीकरणात २ हजार ११६ लोकांवर उपचार सुरु आहेत.