09 March 2021

News Flash

रायगड जिल्ह्यात दिवसभरात ३८८ नवे करोनाबाधित, आठ जणांचा मृत्यू

जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १६ हजार ३२९ वर

प्रतिकात्मक छायाचित्र

रायगड जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. दिवसभरात ३८८ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. ३२५ जण करोनातून पुर्ण बरे झाले तर आठ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकुण करोनाबाधितांची संख्या १६ हजार ३२९ वर पोहोचली आहे. यापैकी १२ हजार ५७५ रुग्ण करोना मुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात ३८८ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात  पनवेल मनपा हद्दीतील १६६, पनवेल ग्रामिण मधील ३३, उरण मधील १३, खालापूर २८, कर्जत १२, पेण ४४, अलिबाग ३३, तळ ३, रोहा १९, सुधागड ३, महाड २७, पोलादपूर ३ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीत २, पनवेल ग्रामिण १, खालापूर १, पेण १, अलिबाग १, महाड १ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३२५ जण करोनातून पुर्ण बरे झाले आहेत.

जिल्ह्यातील ५२ हजार ७६१ जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ३१३ रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १ हजार ३९९, पनवेल ग्रामीण हद्दीतील ३५५, उरण मधील १७६, खालापूर २५७, कर्जत १०७, पेण २६९, अलिबाग १८७, मुरुड ५३, माणगाव ६९, तळा येथील ४, रोहा १६५, सुधागड १७, श्रीवर्धन २९, म्हसळा ७१, महाड १३५, पोलादपूर मधील २० करोनाबाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची प्रमाण ७७ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के टक्के आहे.

कोविड केअर सेंटरमध्ये ४४७, डेडिकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये ५५७, डेडिकेटेड कोविड केअर हॉस्पीटलमध्ये २१३ तर गृह विलगीकरणात २ हजार ११६ लोकांवर उपचार सुरु आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2020 9:19 pm

Web Title: 388 new corona patients in a day in raigad district eight people died msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 यवतमाळ जिल्ह्यात दिवसभरात तीन करोनाबाधितांचा मृत्यू, ७९ नवे रुग्ण
2 करोना रूग्णांना राखी बांधून परिचारिकांनी केली नात्यांची वीण अधिक घट्ट
3 चंद्रपुरमध्ये “पालकमंत्री आशा सुरक्षा सुविधा व आशा किरण” योजनेचा शुभारंभ
Just Now!
X