रायगड जिल्ह्यात  चोवीस तासांत करोनाचे ३९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे करोनाबाधितांची एकूण संख्या ८४० वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.

आज जिल्ह्यात ३९ नव्या करोना बाधितांची भर पडली, यात  पनवेल मनपा हद्दीतील ८, पनवेल ग्रामिण मधील १,  खालापूर २, पेण १, अलिबाग मधील ९, मरुड मधील २, माणगाव मधील ३, तळा १, रोहा ८, श्रीवर्धन २, तर पोलादपूर २ रुग्णांचा समावेश आहे. अलिबाग आणि मुरुड येथील एका रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात १९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील ३०४१ जणांची करोना चाचणी करण्यात आली. यातील २१२८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर,  ८४० जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. ७३ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. २७० जणांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या ३२७ करोनाबाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १४९, पनवेल ग्रामिण हद्दीतील ५४, उरण मधील २०, पेण ५, अलिबाग १५, तळा येथील ५, कर्जत ६, खालापूर ५, माणगाव ३४,  रोहा १३, पोलादपूर ६ महाड १, तर श्रीवर्धन ३ मधील करोना बाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ३७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात ३०९ जणांचे संस्थात्मक अलगीकरण तर १३ हजार ०३९ जणांचे घरात अलगीकरण करण्यात आले आहे. तर करोनाबाधितांच्या संपर्कात आलेले २५ हजार ६३५ जणांना सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.