03 December 2020

News Flash

रायगड जिल्ह्यात करोनाचे ३९८ नवे रुग्ण; सात जणांचा मृत्यू

दिवसभरात ३७४ जणांची करोनावर मात

प्रतिकात्मक छायाचित्र

रायगड जिल्ह्यात दिवसभरात ३९८ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले. तर ३७४ जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत. दिवसभरात ७ जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १४ हजार ४७३ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात ३९८ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात पनवेल मनपा हद्दीतील ११९, पनवेल ग्रामिणमधील ४३, उरणमधील १८, खालापूर ३०, कर्जत १८, पेण ५४, अलिबाग ३१, माणगाव १२, रोहा २१, सुधागड ५, श्रीवर्धन ८, म्हसळा ६, महाड ३१ पोलादपूर २ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीत २, उरण २, कर्जत १, रोहा २ जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३७४ जण करोनातून पूर्ण बरे झाले आहेत.

जिल्ह्यातील ४६ हजार ५२२ जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ४७७ रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १ हजार ४५२, पनवेल ग्रामिण हद्दीतील ३९९, उरणमधील १७०, खालापूर २८५, कर्जत १०१, पेण २८३, अलिबाग २४५, मुरुड ४५, माणगाव ९२, तळा येथील १, रोहा १३६, सुधागड १६, श्रीवर्धन ३०, म्हसळा ७१, महाड १३४, पोलादपूर मधील १७ करोनाबाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ७३ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के टक्के आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 9:39 pm

Web Title: 398 new corona patients in raigad district seven people died aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 ठाकरे सरकारकडूनही लॉकडाउन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय
2 महाराष्ट्रातील करोनाबाधित रुग्णसंख्या चार लाखांच्या पुढे, १४ हजार ४६३ जणांचा मृत्यू
3 अकोल्यात अडीच हजारांचा टप्पा ओलांडला
Just Now!
X