News Flash

शरद पवार यांच्या गोविंदबाग बंगल्यातल्या चार कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा

घरातल्या कुणालाही करोनाची लागण नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. (संग्रहित छायाचित्र)

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या बारामतीतल्या गोविंदबाग बंगल्यात तैनात असलेल्या चार कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. शुक्रवारी या चौघांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. एक महिला आणि तीन पुरुष कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. या आधी शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानावरच्या कर्मचाऱ्यांनाही करोनाची बाधा झाल्याची बातमी समोर आली होती. आता त्यांच्या बारामतीतल्या बंगल्यातल्या चार कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. सिल्वर ओकमधल्या कर्मचाऱ्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली तेव्हा शरद पवार यांचीही करोना चाचणी करण्यात आली. ती टेस्ट निगेटिव्ह आली होती.

शरद पवार यांची करोना टेस्ट निगेटिव्ह आली होती तरीही ते सेल्फ आयसोलेशनमध्ये गेले. आता त्यांच्या बारामती येथील गोविंदबागच्या घरातल्या चार कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. ANI ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. शरद पवार यांच्या घरातील कुणालाही करोनाची बाधा झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या बंगल्यावरच्या कर्मचाऱ्यांची चाचणी जेव्हा पॉझिटिव्ह आली तेव्हा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्वतः शरद पवार यांची प्रकृती उत्तम असल्याचं सांगितलं. खबरदारीचा उपाय म्हणून ते सेल्फ आयोसोलेशनमध्ये गेल्याचंही स्पष्ट केलं. आता त्यांच्या बारामतीतल्या गोविंदबाग या बंगल्यातील चार कर्मचाऱ्यांनाही करोनाची बाधा झाल्याची माहिती एएनआयने दिली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2020 1:07 am

Web Title: 4 domestic help workers working at ncp leader sharad pawars bungalow in govind baug baramati have tested positive for covid19 scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 साखरेला योग्य दर न मिळाल्यास कारखाने संकटात
2 रत्नागिरीत एका दिवसात १४५ करोनाबाधित रुग्ण
3 रत्नागिरीहून सांगली-कोल्हापूरला एसटीची बससेवा सुरू
Just Now!
X