21 November 2017

News Flash

चिपळूणजवळ अपघातात चार प्रवासी ठार, बारा जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील आसुर्डे गावाजवळ एका खासगी ट्रॅव्‍हल्सची बस झाडाला धडकून उलटल्‍याने झालेल्‍या

चिपळूण | Updated: November 20, 2012 12:42 PM

मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील आसुर्डे गावाजवळ एका खासगी ट्रॅव्‍हल्सची बस झाडाला धडकून उलटल्‍याने झालेल्‍या अपघातात ४ प्रवासी ठार आणि बारा जण गंभीर जखमी झाले आहेत. आज (मंगळवार) पहाटे हा अपघात झाला. या अपघातानंतर बसचा चालक पळून गेला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
मुंबईहून गोव्याकडे जाणीरी ही बस आसुर्डे गावाजवळ बस चालकाचा ताबा सुटल्याने झाडाला धडकली आणि उलटली. त्यानंतर बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या दहा फूट खड्यामध्ये पलटी झाली. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना डेरवन येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.       
अपघातापूर्वी या बसने एका सुमोलाही धडक दिल्‍याचे काही प्रवाशांनी सांगितले. अपघातातील मृत प्रवाशांची ओळख पटलेली असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

First Published on November 20, 2012 12:42 pm

Web Title: 4 killed and 12 injured in bus accident near chiplun
टॅग Bus Accident,Chiplun