News Flash

राज्यभरात गणेश विसर्जनादरम्यान बुडून चौघांचा मृत्यू

आष्टी तालुक्यातील माणिकवाडामध्ये तिघे जण तर नांदेडमध्ये नदीत एक जण बुडाल्याची घटना घडली आहे.

राज्यभरात उत्साहात गणेशविसर्जन सुरु असतानाच गणेश विसर्जनादरम्यान पाण्यात बुडाल्याच्या घटनांनी या उत्साहाला दुर्घटनांचे गालबोट लागले. आष्टी तालुक्यातील माणिकवाडामध्ये तिघे जण तर नांदेडमध्ये नदीत एक जण बुडाल्याची घटना घडली आहे.
वर्धातील आष्टी तालुक्यातील माणिकवाडा येथे गणपती विसर्जनासाठी चौघे जण कडा नदीत उतरले होते. मात्र पाण्याच्या प्रवाहात हे चौघे बुडू लागले. यातील एकाला वाचवण्यात यश आले असले तरी उर्वरित तिघांना वाचवण्यात अपयश आले. गुड्डू नेहारे, हंसराज सातेकुवार केशव मसराम अशी या तिघांची नावे आहे. हे तिघेही २० ते ३० वर्ष या वयोगटातील आहेत. तासाभरानंतर या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेने माणिकवाडा येथे शोककळा पसरली होती,
नांदेड जिल्ह्यातही गणेश विसर्जनादरम्यानही एकाचा मृत्यू झाला आहे. कुंडलवाडी नगरपरिषदेचे कर्मचारी विजय वाघमारे हे विसर्जनासाठी जात असताना पाय घसरुन नदीत पडले. यात पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2016 6:56 pm

Web Title: 4 people drowned during ganesh visarjan in maharashtra
Next Stories
1 कोल्हापुरमध्ये विसर्जनावेळी ह्रदय विकाराने एकाचा मृत्यू…
2 Ganpati Visarjan MAHARASHTRA : बुलढाण्यात मिरवणुकीवर मधमाशांचा हल्ला, ३५ जखमी
3 Ganpati Visarjan MUMBAI : लाडक्या बाप्पाला मुंबईकरांचा वरूणराजाच्या साथीने भावपूर्ण निरोप
Just Now!
X