रत्नागिरी जिल्ह्यात ४० नवे करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यांपैकी कामथे उपजिल्हा रूग्णालयात १४, रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात ८, राजापूर ग्रामीण रूग्णालयात २, कळंबणी ग्रामीण रूग्णालयात ७ आणि दापोली तालुक्यात १ रुग्ण आढळला आहे.

जिल्हा रुग्णालयातील आणखी तीन कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. याशिवाय काल सापडलेल्या करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तिघाजणांना करोनाची लागण झाली आहे. दरम्यान, चिपळूणमध्ये १४ रूग्ण वाढले आहेत. त्यापैकी १३ शहरातील पेठमाप-गोवळकोट रोडवरील एकाच इमारतीतील असून १ केतकीमधील आहे.

शासकीय रुग्णालयातील अधिसेविका देखील करोनाबाधित निघाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कळंबणीतील अहवालामध्ये घरडा कंपनीतील ५ नवे पॉझिटीव्ह असल्याची माहिती आहे.