News Flash

महाराष्ट्रात लसीचा दुसरा डोस घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू; कारण अस्पष्ट

मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे

संग्रहित (PTI)

भिवंडी शहरात मंगळवारी सकाळी करोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर काही वेळाने चक्कर येऊन एका आरोग्य सेवकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून शवविच्छेदन अहवालानंतरच हे कारण स्पष्ट होऊ शकणार आहे..

या घटनेत मृत्यू पावलेली ४० वर्षीय व्यक्ती ठाण्यातील मनोरमानगर परिसरामध्ये राहात होती. भिवंडीतील एका खासगी डॉक्टरकडे वाहनचालक म्हणून ते काम करीत होते. त्यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता भिवंडी शहरातील भाग्यनगरमधील केंद्रात करोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतला होता. त्यानंतर ते लसीकरण केंद्रातील प्रतीक्षागृहात थांबले होते. पंधरा मिनिटांनी चक्कर येऊन ते खाली पडले.

मुंबईतील २९ खासगी रुग्णालयांमध्ये मिळणार करोनाची लस; वाचा यादी

त्यांना उपचारांसाठी भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या वृत्तास भिवंडी महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के आर. खरात यांनी दुजोरा दिला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल. दरम्यान कुटुंबीयांनी मृत्यूची पूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 10:56 am

Web Title: 40 year old driver dies hours after second covid vaccine shot in bhiwandi sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 संजय राठोडांचा राजीनामा अजूनही मुख्यमंत्र्यांच्या खिशात?
2 “इंदिरा गांधींची निवडणूक रद्द करण्याची हिंमत तेव्हाच्या आपल्या न्यायव्यवस्थेत होती, आज…”
3 साताऱ्यात पाइपलाइन फोडून दोन हजार लिटर पेट्रोल लंपास; विहीरी पेट्रोलने भरल्याने शेतकरी त्रस्त
Just Now!
X