भिवंडी शहरात मंगळवारी सकाळी करोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर काही वेळाने चक्कर येऊन एका आरोग्य सेवकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून शवविच्छेदन अहवालानंतरच हे कारण स्पष्ट होऊ शकणार आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या घटनेत मृत्यू पावलेली ४० वर्षीय व्यक्ती ठाण्यातील मनोरमानगर परिसरामध्ये राहात होती. भिवंडीतील एका खासगी डॉक्टरकडे वाहनचालक म्हणून ते काम करीत होते. त्यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता भिवंडी शहरातील भाग्यनगरमधील केंद्रात करोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतला होता. त्यानंतर ते लसीकरण केंद्रातील प्रतीक्षागृहात थांबले होते. पंधरा मिनिटांनी चक्कर येऊन ते खाली पडले.

मुंबईतील २९ खासगी रुग्णालयांमध्ये मिळणार करोनाची लस; वाचा यादी

त्यांना उपचारांसाठी भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या वृत्तास भिवंडी महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के आर. खरात यांनी दुजोरा दिला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल. दरम्यान कुटुंबीयांनी मृत्यूची पूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 40 year old driver dies hours after second covid vaccine shot in bhiwandi sgy
First published on: 03-03-2021 at 10:56 IST